माढा व महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीसाठी 5 कोटी व अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत 25 लाख रूपयांची आ.रणजितसिंहांची मागण

माढा व महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीसाठी 5 कोटी व अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत 25 लाख रूपयांची आ.रणजितसिंहांची मागण
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 16/9/2023 : माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत विकासकामांसाठीआ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ककउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रूपयांची मागणी केली आहे.
माढा विधानसभा मतदार संघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत डांबरी व काँक्रीट रस्ते, गटारी, सभामंडप इत्यादी कामांच्या माध्यमातून परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघातील महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीच्या विविध प्रभागातील 26 कामांसाठी व माढा नगरपंचायतीसाठी 6 कामांसाठी एकूण 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत.
तसेच अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत मोडनिंब (2), बेंबळे, सुर्ली या गावातील विविध कामांसाठी 25 लाखांच्या निधीची मागणीही करण्यात आली आहे.