ताज्या घडामोडी

शाश्वत विकासासाठी अभियांत्रिकी या माध्यमातून अभियंता दिन साजरा

शाश्वत विकासासाठी अभियांत्रिकी या माध्यमातून अभियंता दिन साजरा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/9/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर -अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.15/9/2023 रोजी सकाळी 10 : 30 वाजता अभियंता दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी केले. त्यात त्यांनी आद्य-अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी धरण व सिंचन प्रकल्प यामध्ये त्यांचे योगदान असल्याचे सांगितले. राष्ट्र उभारणीत शेतकऱ्यानंतर अभियंत्याचा देखील मोठा वाटा असल्याचे सांगितले व इंजिनिअरिंग जगायला शिका असाही संदेश त्यांनी दिला. शाश्वत विकासासाठी अभियांत्रिकी ही २०२३ च्या अभियंता दिनाची थिम असल्याचे प्राचार्यानी सांगितले. त्यानंतर सर्व भावी अभियंत्यांनी आपापल्या विभागामध्ये विविध टेक्निकल स्पर्धा घेऊन अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमास सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर चि. शिवतेज बागल (प्रथम वर्ष संगणक पदविका) ,चि. शिवतेज माने देशमुख (प्रथम वर्ष संगणक पदविका) व कु. वैभवी गोसावी (द्वितीय वर्ष यांत्रिकी पदविका) या विध्यार्थ्यानी अभियंता दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.श्रीकांत कासे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन कु. प्रगती लोखंडे (प्रथम वर्ष संगणक पदविका) हिने तर आभार प्रदर्शन कु. भाग्यश्री फडतरे (प्रथम वर्ष संगणक पदविका) हिने केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.