ताज्या घडामोडी

अकलूज नगर परिषदेची कार्य तत्परता, नागरिकांतून धन्यवाद

अकलूज नगर परिषदेची कार्य तत्परता, नागरिकांतून धन्यवाद

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/9/2023 : येथील जुन्या एसटी बस स्टँड च्या नजीक असलेल्या कदम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ते बॅकवर्ड हौसिंग सोसायटी आंबेडकरनगर मध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्या शेजारील फुलझाड, त्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सर्वांनाच त्रासदायक ठरत होते. अनेक दिवसांपासून ची ही समस्या जाणून घेऊन पाक्षिक वृत्त एकसताचे कार्यकारी संपादक व वंचित बहुजन आघाडीचे अकलूज शहर अध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर कांबळे यांनी अकलूजनगर परिषदेस सदर फुल झाडाचे छायाचित्र पाठवून, येण्या जाण्यास अडचण ठरणारे फुल झाड छाटून व्यवस्थित करावे. असे सुचविले.

त्याचबरोबर सदर हॉस्पिटल मधून या रस्त्यावर सोडण्यात येणाऱ्या घाण सांड पाण्याचेही व्हिडिओ शूटिंग जागृत पत्रकार कांबळे यांनी नगरपरिषद कार्यालयास पाठवून, दलित वस्ती मधील सार्वजनिक रस्त्यावर सोडण्यात येणाऱ्या घाण सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा असेही सूचित केले आहे.


अकलूज नगर परिषदेने पत्रकार कांबळे यांच्या सूचनेची तात्काळ दखल घेऊन सदर फुल झाडाची तातडीने छाटणी करून बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटीमध्ये ये जा करणाऱ्यांची अडचण तातडीने सोडविली. त्यामुळे सदर हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी अकलूज नगरपरिषद आणि पत्रकार सुनील कांबळे यांना धन्यवाद देत आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button