गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार विजेत्यांना राज्यभर एसटी बसचा मोफत प्रवास मिळावा : अशोक जाधव

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार विजेत्यांना राज्यभर एसटी बसचा मोफत प्रवास मिळावा : अशोक जाधव
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 14/9/2023 :
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” देऊन गौरवण्यात येते अशा गुणवंत कामगारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मोफत प्रवास व शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय व्हावी. अशी मागणी अशोक जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हापूर येथे झालेल्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या अधिवेशनात झालेल्या ठरावांची अंमलबजावणी व्हावी म्हणून व असोसिएशनच्या इतर मागण्यांचा संदर्भात राज्य गुणवंत कामगार असोशिएशन सातारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान विधान परिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांना लेखी निवेदन देण्यात आले.
त्यावेळेस राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक जाधव व कार्याध्यक्ष गजानन घाडगे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.
कामगार मंत्री श्री खाडे व राज्य असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात लवकरच बैठक आयोजित करून कामगारांच्या मागण्या मार्गी लावू असे आश्वासन आ. राम राजे नाईक निंबाळकर यांनी दिले.