ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे
मध्यरात्री बाराची महापूजा संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 11/9/2023 : बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध जागृत श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे सरत्या श्रावणी सोमवार निमित्त मोठ्या स्वरूपात यात्रा भरली. लाखोच्या संख्येने उपस्थित राहून समस्त भाविक भक्तांनी, पावसासाठी श्री सोमेश्वर चरणी प्रार्थना करीत साकडे घालून श्री सोमेश्वरांचे दर्शनाचा लाभ घेतला. रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजता ची महापूजा बारामती चे डी.वाय.एस्.पी.गणेशराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, राजेंद्र मुगूटराव काकङे व सौ.मंदाकिनी राजेंद्र काकङे, बारामती अर्बन बँकेचे चेअरमन सचिनशेठ सातव व त्यांच्या पत्नी डॉ सुहासिनी सचिन सातव (नगरसेविका), या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

याप्रसंगी प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन रणजित अशोकराव तावरे, वाघळवाडी ग्रामपंचायत सरपंच तुषार सकुंडे, माळेगाव ग्रामपंचायत सरपंच जयदीप दिलीपराव तावरे, अकलूज वैभव व वृत्त एकसत्ता, akluj vaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ सदस्य रवींद्र नामदेव पवार, बारामती दूध संघाचे प्रशांत खलाटे, प्रवीण कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सोमवार सकाळी 8:15 वाजता देवाची महापूजा होईल.सकाळी 9:15 वाजता वाजत गाजत मानाचे ग्रामस्थ आंबवङे(ता. खटाव) व करंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सोमेश्वर भाविक कोळी बांधव यांच्या उपस्थितीत पालखी खोमणे भेटीसाठी मार्गस्त होईल. 11:45 पालखी पालखी स्थळावर पोहचेल.12 वाजता खोमणे परिवार कोराळे व खोमणे परिवार जळगांव पालखीची विधीवत पुजा, मानसन्मान करतील.पालखी 1 तास भाविकांच्या दर्शनासाठी थांबेल.खोमणे परिवार दुपारी 2 वाजेपर्यंत वाजत गाजत पालखी मंदिरात पोहोचवतील.नंतर देवाची आरती करून यात्रेची सांगता होईल. यात्रा काळात वङगांव पोलीस स्टेशन API सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली

करंजेपूल पोलीस चौकी चे पीएसआय योगेश शेलार यांनी चोख व कङक पोलीस बंदोबस्त ठेवला. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे,व्यावसायिकांना त्रास होईल असे से कृत्य कोणी करू नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सर्वांनी घेतली. यात्रा कालावधीमध्ये सुसज्ज गाङी पार्किंग व्यवस्था केली गेली होती. स्वच्छता राखली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांनी भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवेची व्यवस्था केली. तसेच करंजेपूल गावचे मंङप व्यावसायिक विजयराव कोळपे यांनी मंदीर परिसरातील लाईट व्यवस्था, सुंदर ङेकोरेशन व रोषणाई , दर्शन लाईन करून मंदीर परिसराची शोभा वाढवली. संपूर्ण यात्रा परिसर सी.सी.टी.व्ही.फुटेज नियंत्रणा खाली असल्याने ट्रस्टच्या ऑफिसमधून यात्रेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी स्वच्छ पाणी व्यवस्था, परिसरातील स्वच्छता केली होती..यात्रा काळात भाविकांची अङचण होऊ नये ,याकरिता बारामती आगार प्रमुख यांनी यात्रेनिमित्त जादा एस टी बस वाहतूक व्यवस्था केली.या वेळी करंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, यादवराव शिंदे मा.सरपंच चौधरवाङी, बाळासाहेब शिंदे संचालक कृषी उत्पन्न बा.स.निरा,शिवाजीराव शेंङकर, निखिल शेंङकर, राहूल शेंङकर, तुषार सकुंङे, महेंद्र गायकवाड, सुचिता साळवे, सोमेश्वर देवस्थान विस्वस्त मंङळ व चेअरमन प्रतापराव भांङवलकर, मोहनराव भांङवलकर, बाळासाहेब भांङवलकर, सोमेश्वर पुजारी अनंता मोकाशी, उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button