साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व शेतकरी मेळाव्याच्या नियोजनाची बैठक

- साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व शेतकरी मेळाव्याच्या नियोजनाची बैठक
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे)
अकलूज दिनांक 02/09/2023 :
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलेले आहे.या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेले आहे. दि. ४ सप्टेंबर २०२३, सकाळी ९:३० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील स्मृतीभवन शंकरनगर अकलूज येथे होणार असलेल्या या नियोजनाच्या बैठकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते नेतेमंडळी, भाजपा कार्यकारणी, मोर्चा, सेल/आघाडीचे सर्व पदाधिकारी, शक्तीकेंद्र व बूथ प्रमुख, तसेच भाजपाच्या सर्व कार्यकर्ता बंधू-भगिनी यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा संघटन मंत्री
धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.