आपला जिल्हाताज्या घडामोडीधार्मिकप्रेरक

श्री अकलाई देवी मंदिरात देवी महात्म्य सामुदायिक पारायण सोहळ्यास प्रारंभ.

श्री अकलाई देवी मंदिरात देवी महात्म्य सामुदायिक पारायण सोहळ्यास प्रारंभ.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo.9860959764.

अकलूज दिनांक 22/8/2023 :
श्रावण मास दुर्गाष्टमीनिमित्त श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज आयोजित देवी महात्म्य सामुदायिक पारायण सोहळ्याचा प्रारंभ मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या अति भव्य सुशोभित मंडपामध्ये करण्यात आला.तत्पूर्वी सकाळी अकलूज शहरातील प्रमुख मार्गावरून सामुदायिक ग्रंथ दिंडी सह 311 कलश धारी नारीशक्ती ची ग्रामफेरी निघाली. यावेळी हनुमान तालीम लेझीम संघातील हलगी पथकाने ग्रंथ दिंडीसमोर आपल्या हलगी नादाचे प्रदर्शन घडविले. तसेच महिलांनी ग्रंथदिंडी प्रसंगी जागोजागी झिम्मा, फुगडी,फेर इत्यादी महिलांच्या पारंपारिक कलांचे सादरीकरण केले. ग्रंथ दिंडी मार्गावरील रहिवासी ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर रांगोळी यांचा थाट केल्याचे आढळून आले.
तीन दिवस सकाळी नऊ ते अकरा या वेळेत देवी महात्म्य सामुदायिक पारायण वाचन सोहळा सुरू राहणार आहे.
सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला सामुदायिक पारायण वाचन सोहळा सुरू असताना श्री अकलाई देवी देवस्थान चे कार्यकारी विश्वस्त जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, दिपकराव शिवाजीराव खराडे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली अशी माहिती देवस्थानचे सचिव तुकाराम टिंगरे बाळासाहेब सणस यांनी साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता, आणि aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना कार्यक्रम स्थळी सांगितली. या धार्मिक सोहळ्याची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन देवस्थानचे मोहन गुरव यांनी केले. व्यासपीठ चालक अक्षय गुरव होते. दररोज कुंकुमार्चन सोहळा होणार आहे. असेही मोहन गुरव यांनी सांगितले. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी नंदकुमार गुरव, मोहन गुरव, मदन गुरव, अक्षय गुरव, अभिषेक गुरव, अनिरुद्ध गुरव, अद्वैत गुरव हे परिश्रम घेत आहेत. या सोहळ्या मध्ये सहभागी असलेल्या सर्व महिलांची चहा आणि नाश्त्याची सोय समस्त गुरव परिवारा तर्फे करण्यात येत आहे. श्री अकलाई देवी मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या सभामंडपामध्ये सामुदायिक ग्रंथ वाचनासाठी 311 आसनांची सोय करण्यात आलेली आहे. आज (दि.22 ) पहिल्या दिवसाचे सामुदायिक ग्रंथ पारायण नंतर आरती मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर सहभागी सर्व महिलांनी गुरव बंधूंच्या सूचनेनुसार संबळाच्या तालावर, देवी गीतांच्या सुरावर नयन मनोहर पद्धतीने, झिम्मा फुगडी, फेर नृत्याचे देवीच्या प्रस न्नतेसाठी सादरीकरण केले.
सकाळी तुकाराम टिंगरे, बाळासाहेब सणस, लक्ष्मण विठोबा आसबे, संतोष लोहार, राजू चव्हाण यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.