रान कवी नामदेव धोंडू महानोर

रान कवी
नामदेव धोंडू महानोर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 3/8/2023 :
आज सकाळी सकाळी बातमी ऐकली कीं, ना धो महानोर यांचं रुबी हॉस्पिटल पुणे या रुग्णालयात 81 व्या वर्षी निधन झाले. ऐकून मन सुन्न झाले. आजच्या काळात माणूस 81 वर्ष जगण म्हणजे दीर्घायुषीच असत. तरी पण नां धो सारखी माणसं शतायुषी व्हावीत असं प्रत्येकाला वाटत. म्हणून महानोर आपल्यातून लवकर निघून गेले असं वाटत.
पळसखेडा हे ना धो च मूळ गाव संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील असल्यामुळे ते मराठवाड्यातील होते असे लोक समजतात. पण हां तालुका आणि या तालुक्यातील अजिंठा लेणी व सोयगाव तालुका हे अहिराणी प्रदेश आहेत. सांस्कृतिक, भाषिक, भौगोलिक दृष्ट्या हां सर्वं भाग खान्देशचाच भाग आहे. म्हणून नां धो हे खान्देशी साहित्यिक होते.
त्यांचे, अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यातील अजिंठा हे एक खंडकाव्य आहे. त्यात ब्रिटिश अधिकार आणि एका आदिवाशी मुलीची प्रेम कथा आहे. त्यावर एक नाटक आले त्यात भिल्ल पात्राच्या तोंडी अहिराणी संवाद दिले आहेत. त्यावर नंतर चित्रपटही त्यातही खान्देशी जीवन चितारले आहे. त्यातली गाणी नां धो ची आहेत.
नां धो यांच्या कविता आणि चित्रपटातील गाणी खूप गाजली आहेत. त्यांच्यावर बालकवी ठोंबरेचा प्रभाव होता. त्यामुळे ते निसर्गाशी जास्त समरस झाले होते.
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य यावे
कोणती पुण्य अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.
त्यांची जैत रे जैत चित्रपटाची गाणी खूप गाजली. त्यातील सर्वच गाणी छान आहेत. एक शृंगार गीत आहे ते बघा,
गोऱ्या देहांवरती कांती, नागिणीची कात
येडे झालो आम्ही द्यावी एखादीच रात
तुझ्या रूपाच बाशिंग डोल्यालात
तुझ्या वाचून सुन्नाट दिनरात
काल्या एकल्या राती,
मन मोडून जाती
आस एखाद पाखरू वेल्हाळ
त्याला सामोरं जात या आभाळ
या चित्रपटातील सर्वच गाणी खूप गाजली आहेत. यातील गाणी आणि संगीत ही खान्देशी लोकगीत आणि लोक सांगितवर आधारीत आहेत. कविता हां त्याच्या लिखानाचा मुख्य भाग असला तरी त्यांनी कथा कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांची गांधारी कादंबरी रझाकार आणि मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामावर आधारीत आहे.
नां धो महानोर काही वर्ष मराठी साहित्य मंडळावर अध्यक्ष म्हणूनही काम पहात होते. त्यांना त्यांच्या लिखाणा बद्दल, पदमश्री हां राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
शेतकऱ्यानां चांगले दिवस यावेत ही त्यांची खूप इच्छा होती. ते दोन वेळा विधान परिषदेवर आमदार राज्यपाल नियुक्त आमदार होते.
मां शरद पवार यांच्यासी त्यांचे खूप जवळचे आणि कौटुंबिक संबंध होते. पवार साहेबांनी त्यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेचा आमदारकीं देऊ केली ती त्यांनी नम्रपणे नाकारली.
असा हां खान्देश आणि महाराष्ट्राचा साहित्य सम्राट आज आपल्याला सोडून गेला. त्यांच्या साठी खान्देश आणि महाराष्ट्र भूमी रडत आहे. साहित्य जगत रडत आहे. हे रडणं बघून नां धो ही व्यथित झाले आहेत. स्वर्गात देवाला म्हणत असतील,
फनाहके बाद भी मुझे सता रहा हैं कोई,
खाक मेरी चिंतासे उठा रहा हैं!
हे ईश्वर जराशी जिंदगी और दे दे,
मेरे लिए आसू बहा रहा हैं कोई!
ईश्वर ना धो यांच्या आत्म्यास चीर शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
बापू हटकर