सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras. District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/7/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि . २७/०७/२०२३ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी डॉ. कलाम यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या महान जिवनकार्याचा थोडक्यात आढावा सांगीतला. त्यामध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे देशाचे मिसाईल मॅन तसेच क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी १९९२ ते १९९९ मध्ये भारताचे संरक्षणमंत्री म्हणून तर २००२ ते २००७ या कालावधीमध्ये भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती होताच देशाच्या एका नव्या पर्वाची सुरूवात केली. त्यांनी अग्नी व पृथ्वी सारख्या मिसाईलच्या निर्मीतीमध्ये महत्वपुर्ण योगदान दिले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे सांगून प्राचार्यांनी डॉ . ए . पी . जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये शै. वर्ष २०२३-२४ मध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड दिले जाणार असून त्या झाडाचे संगोपन विद्यार्थी व पालकांनी करून पर्यावरणाचे रक्षण करावयाचे आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा . श्रीकांत कासे यांनी केले .