ग्रामीण रस्त्यांना तुकडीकरण व टप्प्याटप्पाने निधी न देता पुर्ण रस्त्याच्या बजेट प्रमाणे निधी वाटप करण्याची आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषदेत मागणी.

ग्रामीण रस्त्यांना तुकडीकरण व टप्प्याटप्पाने निधी न देता पुर्ण रस्त्याच्या बजेट प्रमाणे निधी वाटप करण्याची आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषदेत मागणी.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे यांज कडून)
मुंबई दिनांक 27/7/2023 :
सोलापूर जिल्ह्यातील ९ हजार ३९३ कि.मी. ग्रामीण मार्ग व १ हजार ३८४ इतर जिल्हा मार्ग असे दोन्ही प्रकारचे एकुण १० हजार ७७८ कि.मी. लांबीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली आहेत संबंधित रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी वाटप होत असताना तुकडीकरण पध्दतीने व टप्याटप्प्याने होत आहे. १० ते १५ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर एक ते दीड कि.मी. डांबरीकरण व मजबुतीकरण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. जिल्हा परिषदांच्या ताब्यातील संपूर्ण लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
आ.मोहिते-पाटील यांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत सांगितले की सोलापूर जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण मार्ग रस्त्यांची लांबी ९३७७.३७ कि.मी. व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची लांबी १२२५.३३ कि.मी. अशी एकूण १०६०२.७० कि.मी.आहे. सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या लांबीचा विचार करता जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रस्ते दुरुस्तीसाठी मर्यादीत स्वरुपात निधी प्राप्त होतो. ग्रामीण मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने रस्त्याची कामे केली जातात. परतु त्यात निश्चितच मर्यादा येत आहेत. त्या त्रुटी दुर करुन जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांचे नुतनीकरण, मजबुतीकरण, देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होईल या प्रमाणे सुचना देण्यात येतील असे स्पष्ट केले.तसेच सोलापूर जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजना व रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम (३०५४- २४१९) अंतर्गत मागील चार वर्षात साधारणपणे रु.२२९.०० कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत देखील ग्रामीण रस्ते दुरुस्तीकरिता सोलापूर जिल्ह्यासाठी साधारणपणे रु. ६३३.०० कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. व यापुढे देखील ग्रामीण रस्त्यांची नवीन कामे आणि देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
“तालुका निहाय इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन यासाठी लागणारा निधी विचारात घेऊन रस्त्यांच्या तुकडीकरणाला आळा घातला तरच रस्त्यांची कामे दर्जेदार होणार आहेत केवळ निविदेतून पळवाट काढण्यासाठी रस्त्यांच्या कामाचे छोटे-छोटे तुकडे पाडले जातात.निविदा प्रक्रियेचे टप्पे नजरेसमोर ठेवून कामांचे तुकडे पाडण्यास मनाई करण्याची गरज आहे” :- आ.रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, विधानपरिषद सदस्य