उड्डाण पुलाखालील परिसराचे डांबरीकरण व काही भागाचे सौंदर्यीकरण करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI कडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी

उड्डाण पुलाखालील परिसराचे डांबरीकरण व काही भागाचे सौंदर्यीकरण करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI कडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी)
कारंजा घाडगे दिनांक 20/6/2023 : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका व कारंजा शहरातून गेलेल्या महामार्गावरील उड्डाणपुलाखालील संपूर्ण परिसराचे डांबरीकरण करून, उड्डाण पुलाखाली सर्विस रोडच्या बाजूला जाळी लावावी व बसस्थानकापुढे उड्डाणपुलाच्या भिंती शेजारी काही जागेवर सौंदर्यकरण करावे अशी मागणी तहसीलदार मार्फत व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदनाद्वारे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.
उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. जड वाहतूक उड्डाण पुलावरून चालू झालेली आहे. आणि आता उड्डाणपुलाखाली काही किरकोळ कामे चालू आहे. यावेळी जांडू कंट्रक्शन कंपनीने उड्डाणपुलाखालील सर्व परिसराचे डांबरीकरण करावे. डांबरीकरण केल्यामुळे भविष्यात हा परिसर साफसफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छ ठेवण्यास मदत होईल. आणि पुलाखाली वाहनधारकांना वाहने पार्किंग करण्याकरता सोयीचे होईल.तसेच उड्डाणपुलाखाली सर्विस रोडच्या काठाने जाळी लावून कठडे तयार करावे. त्यामुळे कोणीही नागरिक मधातूनच सर्विस रोड क्रॉस करणार नाही. त्यामुळे अपघात टाळता येईल.
तसेच बस स्थानकापुढे उड्डाणपुलाच्या आडव्या भिंतीच्या बाजूला दोन पिल्लरच्या मधात काही जागेवर सौंदर्यकरण करण्यात यावे. त्या ठिकाणी हिरवळ लावून त्यावर ‘ ‘ ‘सुस्वागतम कारंजा ‘ असे नाव लिहिता येईल. उड्डाणपुलाचे बांधकाम करत असताना कन्ट्रक्शन कंपनीने तिथे बोअरवेलची व्यवस्था केलेली आहे. त्या बोरवेल ला भरपूर पाणी आहे. त्या पाण्याचा वापर त्या सौंदर्यकरणात पाण्याचे कारंजे तयार करण्या करीता करता येईल. त्यामध्ये नाईट लाईटची व्यवस्था करता येईल.तसेच गोळीबार चौकामध्ये उड्डाणपुलाच्या खालील भाग उंच झालेला आहे. सर्विस रोड वरून वाहनांना चढताना व उतरताना चढ- उतार तयार झाला आहे. बस स्थानकापुढे ज्याप्रकारे डांबरीकरण करून सलग परिसर तयार केला तसाच परिसर गोळीबार चौकात करण्यात यावा.
उड्डाण पुलावरील सर्विस रोडचे स्ट्रीट लाईट दररोज रात्रीला नियमित चालू ठेवावे . आणि सौंदरीकरणात भर म्हणून उड्डाणपुलाची रंगरंगोटी करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्यामार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे व्यवस्थापक यांना कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने दिले आहे. सदर निवेदनाच्या प्रतिलिपी माहिती करीता मुख्याधिकारी नगरपंचायत कारंजा व जांडू कंट्रक्शन कंपनीला दिल्या आहे. निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.