अकलूज येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

अकलूज येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 24/7/2023 : कै.श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूजच्या वतीने घेण्यात आलेली बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी रत्नाई चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स.म.शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर येथे केले होते. आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धेकांचा सहभाग असलेल्या व ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धा असा नाव लौकिक मिळविलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण स. म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ही स्पर्धा तीन गटात भरविण्यात आली. यामध्ये १० वर्ष वयोगटात १७१, १५ वर्ष वयोगटात २३६ तर खुल्या गटात १०५ अशा एकूण ५१२ खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये सोलापूर मधून ४८०, सातारा १२, सांगली ४, पुणे १०, उस्मानाबाद २ व अहमदनगर २ असा सहभाग नोंदविला. स्विझलिंग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत खुल्या गटातून प्रथम वीस क्रमांकाना इतर गटातील प्रत्येक प्रथम पाच क्रमांकांना रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांक व कंसात बक्षीसे १० वर्ष वयोगट- प्रथम-सानवी गोरे, बार्शी (रोख रु. १००१/- व ट्रॉफी) द्वितीय-ओम निरंजन, सोलापूर (रोख रु. ६०१/- व ट्रॉफी) तृतीय -सिद्धांत कोठारी, बार्शी(रोख रु. ५०१/- व ट्रॉफी) चतुर्थ-अमेय जामदार, अकलूज (रोख रु. ४०१/- व ट्रॉफी) पंचम- विनय रणसुबे,अकलूज (रोख रु. ३०१/- व ट्रॉफी) तर
१५ वर्ष वयोगट- प्रथम- सोहम शेटे,बार्शी (रोख रु. १००१/- व ट्रॉफी) द्वितीय-अर्पण सोनवणे, दौंड(रोख रु. ६०१/- व ट्रॉफी) तृतीय -श्रुतिका पवार, शंकरनगर (रोख रु. ५०१/- व ट्रॉफी) चतुर्थ-पार्थ पाटील,अकलूज (रोख रु. ४०१/- व ट्रॉफी) पंचम-अथर्व राठोड,करमाळा (रोख रु. ३०१/- व ट्रॉफी) आणि खुल्या गटात प्रथम- मिलिंद नांदळे, लोणंद (रोख रु. २००१/- व ट्रॉफी) द्वितीय-शंकर साळुंके, बार्शी (रोख रु. १००१/- व ट्रॉफी) तृतीय – शुभम कांबळे, फलटण (रोख रु. ८०१/- व ट्रॉफी) चतुर्थ-योगेश शिंदे, फलटण (रोख रु. ४०१/- व ट्रॉफी) पंचम-प्रसन्न जगदाळे, बार्शी(रोख रु. ३०१/- व ट्रॉफी)
तसेच फक्त माळशिरस तालुका १५ वर्ष वयोगट प्रथम- रक्षिता जाधव, द्वितीय-अथर्व माने, तृतीय – सत्यजित भोळे, चतुर्थ- जलजाक्ष बावळे, पंचम- श्लोक ठोंबरे आणि १० वर्ष वयोगटात प्रथम- अनन्या बाळापुरे, द्वितीय- हर्ष जाधव, तृतीय – आर्यन दोशी, चतुर्थ- नितीन शिद, पंचम-राजवर्धन पराडे
सहभागी गटातून उत्कृष्ट महिला पालक शुभांगी भगत , पुरुष पालक चंद्रशेखर बासगीकर, जेष्ठ खेळाडू संतोष गोरे, उत्कृष्ट दिव्यांग अजीम शेख, सर्वात लहान खेळाडू सानवी बनकर अशा खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच सहभागी सर्व खेळाडूंना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून सोलापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सदस्य व स्पर्धेचे प्रमुख पंच उदय वगरे, स्पर्धाप्रमुख अभिजित बावळे, संजय शिंदे, कर्णाक्षी जाधव, रमेश जाधव, अनिता बावळे, प्रभावती लंगोटे, अली शेख यांनी कामकाज पाहिले. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, मंडळाचे संचालक मंडळ, सदस्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक, बहुसंख्य खेळाडू त्यांचे पालक, प्रेक्षक उपस्थित होते.