कविता विश्व.
वस्त्रहरण

काव्य विश्व…….✍️
वस्त्रहरण..
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/7/2023 :
तिचेच नाही वस्त्रहरण,
हे तर व्यवस्थेचे सरण..
काढली जेंव्हा नग्न धिंड,
तेव्हाच लोकशाहीचे मरण!
कारण काहीही असो,
जळते आहे मणिपूर..
निरो वाजवतोयं फिडल,
कसे झालात एवढे निष्ठूर ?
हिंसाचाराचे रौद्र स्वरूप,
त्यात अमानवीय व्यभिचार..
बेटी बचाव- बेटी पढाव,
बोलण्यातच फक्त सदाचार !
कितीही अन् कसेही झाका,
पडलेत तुमचे चेहरे उघडे..
महिलांना विवस्त्र करणारेच,
झालेत जगापुढे नागडे !!
राजेंद्र काळे
बुलडाणा ९८२२५९३९२३