ओंकार साखर कारखाना परिवाराकङुन कर्मचारीवर्गांला 20% पगार वाढ

ओंकार साखर कारखाना परिवाराकङुन कर्मचारीवर्गांला 20% पगार वाढ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/11/2025 :
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील, ओमराजे बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रसह कर्नाटकात साखर कारखानदारीत धाङसाने मोठे पाउल टाकले व आज यशस्वी झाले. जवळपास १७ युनिटच्या माध्यमातून 20 हजार कर्मचाऱ्यांच्या व प्रत्यक्ष अप्रत्यक्षांच्या हाताला काम दिले. अनेकांचे कोलमोङलेले संसार उभे करण्याचे काम बोञे पाटील यांनी केले.
कर्मचारीवर्गांला 20 टक्के पगारवाढ केली जाणार आहे अशी माहिती ओंकार परिवाराकङुन देण्यात आली. यूनिट एक मध्ये ऊस गाळपाचे विना अङथळा १ लाख मॅट्रिक टनाचा टप्पा पुर्ण केल्याने कर्मचारी वर्गांने मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी केन मॅनेजर शरद देवकर, इलेक्ट्रिक विभाग प्रमुख प्रमुख धनाजीराव पवार, मेजर मोहन घोङके, रमेश औताङे, मोहन सरगर, प्रशांत कस्तुरे, धर्मा बोङरे, बहुसंख्य कर्मचारी व वाहन मालक उपस्थित होते.
बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने बोञे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
“ओंकार परिवारासाठी माझा शेतकरी व कर्मचारीवर्ग आत्मा आहे.ते माझ्यापाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानेच परिवाराने भरारी घेतली” – बाबुरावजी बोञे पाटील
