खान्देशाच्या हितासाठी एक व्हा!

खान्देशाच्या हितासाठी एक व्हा!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/10/2023 :
खान्देशाच्या हितासाठी खान्देशातील सर्वं विद्यार्थी संघटना, विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी मित्र एक व्हा!
खान्देशांत अनेक महाविद्यालय आहेत. त्यात शिकणारी हजारो मुलं आहेत. तें सर्वं अनेक पक्षीय संघटनातून कार्यरत आहेत. या संघटनाचे सर्वं प्रदेश अध्यक्ष खान्देश बाहेरील आहेत. आपली मुलं त्यांना बळ द्यायचं काम करतात. स्वतः ची कुठलीही काम ही मुलं ठरवून करत नाहीत. फक्त वरुन येणारे आदेश पाळणे बस. अरे खान्देशचे सुद्धा काही प्रश्न आहेत.
खांदेशात खान्देशसाठी धुळ्यात एक कृषी विद्यापीठ असावं अशी सर्वांची धारणा आहे. पण कृती काहीच करत नाहीत. ना स्थानिक पुढारी ना विद्यार्थी संघटना कोणीही कृती करत नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकण, प महाराष्ट्र यां सर्वं जागी कृषी विद्यापीठ आहेत. मग खान्देशसाठी का नको?
तुम्हाला मराठवाड्यातील स्व वसंतरावं नाईक कृषी विद्यापीठ परभणी माहीत आहे. हे विद्यापीठ स्थापन केले त्यावेळी त्या अंतर्गत परभणीचे तेवढे एकच कृषी महाविद्यालय होते. त्या एका महाविद्यालयास विद्यापीठाचा दर्जा मिळावीला. किती अवघड गोष्ट आहे. पण तिथल्या विद्यार्थ्यांनी तें मिळविले. तीव्र लढा दिला, आंदोलन केले, शेवटी तिथले विद्यार्थी आमरण उपोषणा बसले. मग सरकार नमल त्यांना विद्यापीठ द्यावे लागले.
मुख्यमंत्री पदही त्यांनी लढून मिळविले आहे. विदर्भ, प महाराष्ट्र आणि कोकण तिन्ही विभागाचे मुख्यमंत्री होऊन गेले होते. पण मराठवाडा आणि खान्देशाच मुख्यमंत्री झाला नव्हता. खान्देशला त्याचं कांय सोयर सुतक नव्हत, आजही नाही. पण मराठवाड्याला अस्मिता होती. त्यांनी मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी आंदोलन केलं आणि पहिलं मुख्यमंत्री पद त्यांना शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मिळविले.
खान्देशाला मुख्यमंत्री पद नाही, कृषी विद्यापीठ नाही, औद्योगि करण नाही, रेल्वे नाही, शेतीच सोडा प्यायला सुद्धा पाणी नाही. त्यामुळे रोजगार नाही म्हणून मग खायला नाही. तर मग पाळतात मुंबई, पुणे, संभाजीनगर सुरत कडे. पण एक माईचा लाल खान्देशांत नाही जो शेतीला पाणी आणि हाताला रोजगार जागेवर देईल. लोकही मागत नाहीत.
ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान.
मग खायच कांय लाकडं? लाकडही आता शिल्लक नाहीत. सर्वत्र उघडे बोडके डोंगर आहेत.
मला आशा आहे आता फक्त तरुण विद्यार्थी मित्रा कडून. सरकारनें, आता 18 वर्षा वरील तरुणांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तों अधिकार वापरून विद्यार्थ्यांनी सत्ता हातात घ्यावी आणि खान्देश वरील अन्याय मोडून काढावा.
आसाम गण परिषद या पक्षाचं नावं तुम्ही ऐकलं असेल. हां पक्ष आसाममध्ये दोन टर्म सत्तेत होता. आताही ही तों पक्ष bjp बरोबर सत्तेत आहे. कोण आहेत हे आसाम गण परिषदेचे लोक? विद्यार्थिच होते तें. बांगलादेशातील बंगलादेशी खूप मोठ्या प्रमाणात आसामात घूसखोरी करत होते. तों लोंढा रोकण्यासाठी आसाम मधील सर्वं पक्षीय विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालवून केंद्र सरकारचं लक्ष या घुसखोरीकडे वेधलें. शेवटी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना या विद्यार्थ्याशी करार करावा लागला. घुसखोरी थांबली. करारा नंतर यां मुलांनी एकत्र येऊन आसाम गण परिषदेची स्थापना केली. लोकांनी त्यांना भराघोष मत दिली आणि आसामचा विद्यार्थी नेता प्रफुल्लकुमार महंतो हा विद्यार्थी मुख्यमंत्री झाला.तें आपलें खान्देशी विद्यार्थी का करू शकत नाहीत? तुमचे पक्ष, संघटना आहेत तशाच राहू द्या तुम्ही पक्ष आणि संघटना सोडू नका. फक्त खान्देशाच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र यां. खान्देश विकासाच्या अनुशेष भरून काढा. मी तुमच्या सोबत येतो. वय अवघे 72 वर्ष आहे तरी उभा आहे,
आंधीयोको जिद है जहाँ बिजलिया गिरानेकी.
मुझे भी जिद है वही आशियाना बनानेकी.
हिम्मत है और हौसले बुलंद है.
खडा हूं मैं अभी गिरा नही हूं मैं.
अभी तों जंग शुरु है और मैं हारा भी नही हूं.
चला उठा युद्ध करा. सुरवात खान्देश कृषी विद्यापिठा पासून करू यां.
विद्यार्थी मित्रानो जागे व्हा.
खान्देश विकासाचे धागे व्हा.
बापू हटकर.
संपर्क 77100 20069