ग्राहक समिती च्या वतीने मोहोळच्या तहसीलदारांना निवेदन

ग्राहक समिती च्या वतीने मोहोळच्या तहसीलदारांना निवेदन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/07/2024 :
ग्राहक समिती च्या वतीने मोहोळच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांची सध्या शाळा कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे. प्रवेशासाठी त्याना विविध प्रकारचे दाखले काढावे लागत आहेत. तसेच मुख्यमंत्री ‘ लाडकी बहीण ‘ 1500 रु. दर महा मानधन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना पण दाखले काढावे लागत आहेत.
ई – महा सेवा केंद्र प्रमुख हे विद्यार्थी व महिलांकडून जास्त पैसे घेतात. त्या केंद्र चालका वर गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्राहक सामिती तर्फे करण्यात आली. या वर्षा पाऊस चांगला झाला आहे. शेतकरी पेरणी, उस लागवड, विविध पिकांची लागवड, पिकांची लागवड करीत आहे. अशावेळी शेतकरी यांच्या कडून बियाणे, खते, रोपे यांची मागणी वाढतआहे. दुकानदार, कृषी केंद्र, नर्सरी चालक, शेतकऱ्यांना बोगस बियाणे, बोगस खते देणे, रोपे व्यवस्थीत न देणे, खताची एक मागणी असेल तर त्याच्या बरोबर मागणी नसणारे खत देणे, किंमत जास्त वसुल करणे इत्यादी प्रकार होत आहेत. त्याची चौकशी करून.त्यांच्या वर कारवाई करून परवाना रद्द करावा. अशी मागणी ग्राहक समिती कडून करण्यात आली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा करण्याचा इशारा देण्यात आला.
मोहोळचे तहसिलदार मुळीक यांना ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजी राव गुंड यांच्या नेतृवाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राहक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ, तालुका अध्यक्ष आनंदराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष बबनराव नरुटे, जिल्हा संघटक प्रमोद लांडे, नानासाहेब मोरे, आप्पासाहेब कांबळे, महादेव जाधव, भारत माळी, गणेश सुनकर,रवि लोंढे,
समाधान शिंगाडे, रेपाळ मामा, बबनराव निचळ, अशपाक बागवान, पपू घोडके, सिताराम माने इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.