ताज्या घडामोडी

डॉ.यशवंत कुलकर्णी यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या ‘कौन्सिल मेंबर्स’ पदी बिनविरोध निवड

डॉ.यशवंत कुलकर्णी यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या ‘कौन्सिल मेंबर्स’ पदी बिनविरोध निवड

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
श्रीपूर प्रतिनिधी : दत्ता नाईकनवरे/
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/7/2025 : श्रीपूर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य.) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासू कार्यकारी संचालक, एक्सलंट अवॉर्ड विजेते, एम.डी. असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत शंकरराव कुलकर्णी यांची पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात DSTA च्या ‘कौन्सिल मेंबर्स’ पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्या विविध अभ्यास गटांवरती डॉ.यशवंत कुलकर्णी गेले अनेक वर्षांपासून तज्ञ म्हणून काम पाहत आहेत. साखर क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड पुण्यात पार पडली.
गेले अनेक वर्षा पासून डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी साखर उद्योग कारखानदारी मध्ये, सखोल अभ्यास करून उत्कृष्ट नियोजन करत, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला एका उच्च शिखरापर्यंत नेऊन, आता पर्यंत अर्ध शतकाच्या वरती राज्य आणि देशपातळी वरचे पुरस्कार मिळवून दिले आहेत.
साखर निर्मिती बरोबरच ऊसापासून इतर उपपदार्थ निर्मिती, सभासद, शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेती विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयीचे मार्गदर्शन, माती परीक्षण प्रयोगशाळा, सुपंत खते, कोजन प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कारखान्याच्या क्षमतेचे विस्तारीकरण केले. कामगाराविषयी हिताचे आणि सुरक्षेचे निर्णय, अ श्रेणीमध्ये ऑडिट मूल्यांकन, कोरोना काळात सॅनिटायझर निर्मिती, ऑक्सिजन निर्मिती याचा देखील प्रकल्प उभा केला.
स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभी करून 100% संगणीकृत कार्यालय, कामांमध्ये अचूक नियोजन करून कारखान्याला चांगली शिस्त लावून, कारखान्याचे देशपातळीवरती नाव लौकिक केले आहे. याचीच पोचपावती म्हणून गेले दहा वर्षांमध्ये कारखान्याला चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाने व डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट नियोजनाने राज्य आणि देशपातळीवरील 60 चे वर पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या बिनविरोध निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून, चेअरमन प्रशांतराव परिचारक, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी व मित्रपरिवाराकडून त्यांचेवर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ आणि राष्ट्रीय पिछडावर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यंक महासंघ दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी. चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनीही डॉ. यशवंत कुलकर्णी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button