तरस सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५ बकरी ठार

तरस सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५ बकरी ठार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/03/2024 :
मालेवाडी ता. वाळवा येथील मेंढपाळ शिंगु कोळेकर यांच्या मेंढ्यांच्या तळावर तरससदृष्य वन्यप्राण्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात ५ बकरी ठार झाली. या घटनेत मेंढपाळाचे ४० ते ४५ हजार रुपयेचे आर्थिक नुकसान झाले आहे. मेंढपाळ शिंगू कोळेकर रा. मालेवाडी ता. वाळवा यांच्या मेंढ्यांचा तळ गावातीलच शेतकरी बजरंग जाधव गट नंबर २०६ यांच्या शेतात खतासाठी बसायला आहे. सोमवार रात्री 10 ते 11 च्या सुमारास तरस सदृश्य प्राण्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला.त्यात ५ मेंढ्यांची पिल्ली ठार जाग्यावरच ठार झाली.
या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक भिवा कोळेकर, वनमजुर विक्रम टिंबे, भगवान गायकवाड, विजय मदने, यांनी पंचनामा केला.
मृत बकऱ्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, जीवन कोळेकर, सर्जेराव कोळेकर रोहित बंडगर व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.