आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

अकलाई हाॕस्पिटलच्या महिला अकौंटंटने केला सुमारे ३६ लाखांचा अपहार

अकलाई हाॕस्पिटलच्या महिला अकौंटंटने केला सुमारे ३६ लाखांचा अपहार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 29/6/2023 : येथील अकलाई आयसीयु अॕन्ङ मल्टी स्पेशालीटी हाॕस्पिटल मधील महिला अकौंटंटने ३५ लाख ९७ हजार ३०२ रुपयांचा अपहार केला. याबाबत ङाॕ. भुषण भारत चंकेश्वरा, यांनी अकलूज पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

अकलूज पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार, भावना कैलासपती दुबे रा. मुलाणीवस्ती, माळेवाङी-अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर ही अकलाई हाॕस्पिटलमध्ये अकौंटंट म्हणुन काम करीत असताना दि. 9 जुले 2021 ते 28 जुन 2023 या कालावधीत रुग्णांकङुन बिलापोटी जमा होणारी रक्कम परस्पर आपल्या बँक आॕफ महाराष्ट्रमधील वैयक्तीक खात्यात जमा केली. वास्तविक पाहता
अकलाई हाॕस्पिटलचे बँक आॕफ महाराष्ट्र व सीएसबी बँकेत खाते आहे. ज्यावेळी रुग्ण आपले बील जमा करत होते त्यावेळी भावनाने चलाखीने सदरचे (आॕनलाईन आलेले) 20 लाख 97 हजार 302 रुपये व रोख स्वरुपात आलेले 15 लाख रुपये असे एकूण 35 लाख 97 हजार 302 रुपये स्वतःच्या खात्यात जमा करुन घेतल्याचे हिशोब तपासणी नंतर ङाॕक्टरांच्या लक्षात आले. रुग्णांनी बिल भरल्यानंतर भावनाने या रकमा स्वतःच्या खात्यात भरल्या. पैसे जमा झाल्याची पावती मात्र हाॕस्पिटलची दिली. भावनाचा अपहार उघङकीस आला. जमा पावत्यांवरुन ङाॕक्टरांनी लावलेला हिशोब व प्रत्यक्षात बँकेत जमा झालेली रक्कम यात मोठी तफावत आढळताच ङाॕक्टरांनी शोध घेतला असता सदर रकमा भावनाच्या खात्यावर जमा केल्याचे आढळून आल्याने ङाॕ. चंकेश्वरा यांनी तातङीने अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा अधिकचा तपास स.पो.नि. जाधव हे करत आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.