श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत

श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 24/6/2023 :
सुमारे ११० वर्षांपूर्वीची पालखी परंपरा असलेल्या श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन सोलापूर जिल्ह्यात शनिवारी (दि.24) झाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. अकलूज येथील महादेव मंदिरात या पालखीचा मुक्काम आहे.
गुरुवार दिनांक 15 जून रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले होते.पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनामध्ये ठेवून निघालेला पालखी सोहळा पारगाव, भोरीएंदी, यवत, पाटस, रावणगाव, शेटफळगडे, भिगवन, डाळज नं.१ , इंदापूर असा प्रवास करून अकलूज येथे मुक्कामासाठी आला आहे. दरम्यान रावणगाव येथे गोल रिंगण तर शेटफळगड येथे मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले असल्याची माहिती सोहळा प्रमुख जनार्दन बावळे यांनी दिली. यावेळी चोपदार शशिकांत जगताप उपस्थित होते.
पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर स्वागतासाठी पुरंदरचे आमदार चंदूकाका जगताप उपस्थित होते. सोपानकाका पतसंस्थेच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार जगताप यांचा वतीने पालखीतील सर्व वारकऱ्यांना चिक्कीचे वाटप करण्यात आले.
या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमनापासून सह. पोलीस फौजदार हनुमंत झरे यांचे नियंत्रणाखाली पाच पोलीस व पंधरा होमगार्ड यांच्यावर संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. हा सोहळा उद्या (दि.25) पंढरपूरकडे जाण्यासाठी बोंडले या गावाकडे रवाना होणार आहे.