“जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही”: खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर 🔷वार्षिक स्नेहसंमेलन आणि माळीनगर फेस्टिवल चे उदघाटन
“जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही”: खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
🔷वार्षिक स्नेहसंमेलन आणि माळीनगर फेस्टिवल चे उदघाटन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 02/12/2023 : “जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही”असे विचार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळीनगर फेस्टिवल चे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मनोगतात व्यक्त केले.
प्रारंभी फुले आंबेडकर नगर नामपलकाचे अनावरण खासदार नाईक निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले. त्यांचा सन्मान कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीशराव गिरमे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे म्हणाले की,
तक्रार करणारी काही मंडळी या संस्थेत आहेत. काही मंडळी तक्रार करतात की वार्षिक स्नेहसंमेलन व माळीनगर फेस्टिवल या कार्यक्रमामुळे मुलांचे नुकसान होते. पण तसे काही होत नाही उलट मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे हे एक आदर्श व्यासपीठ या निमित्ताने निर्माण झाले आहे. असे सांगत,”खा. निंबाळकर आपले आहेत मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत. कोणीही उभा राहिला तरी शंभर टक्के मतदान आमचे निंबाळकरांना असणार आहे अशा शब्दात राजेंद्र गिरमे यांनी निर्धार व्यक्त केला.
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.माळीनगर, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर विकास मंडळ, शुगर केन सोसायटी, महात्मा फुले पतसंस्था माळीनगर, दि मॉडेल विविधांगी प्रशाला, गुलमोहर इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळा क्र .1 ते 5 यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 2 डिसेंबर 2023 ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे “वार्षिक स्नेहसंमेलन” व माळीनगर फेस्टिवल 2023 चे आयोजन केले आहे.
आज दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:56 वा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 18 व्या. फेस्टिवल चे उदघाटन झाले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रशालेतील 1700 विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून प्रशालेच्या प्रांगणात विविध खेळणी, खाद्यपदार्थ, ज्वेलरी इत्यादींचे 110 स्टॉल उभारले आहेत. अशी माहिती सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सांगण्यात आली.