विजयकांत शंकरराव कुदळे यांचे अल्पशा आजाराने निधन

विजयकांत शंकरराव कुदळे यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 17/01/2026 : माळीनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे माजी व्यवस्थापकीय संचालक विजयकांत शंकरराव कुदळे(वय ८५ वर्षे) यांचे दि.16 जानेवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांनी माळीनगर साखर कारखान्याचे अध्यक्ष व पूर्णवेळ संचालकपद, शुगरकेन सोसायटी,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते. ते सध्या एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदावर कार्यरत होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन,दिल्ली या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. शेतकरी जागरण मंचचे ते संस्थापक अध्यक्ष होते. साखर उद्योग व शेतकरी प्रश्नांवर त्यांनी सकाळ,ऍग्रोवनमध्ये अनेकदा लेखन केले होते.साहित्यात त्यांना रुची होती.काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.माळीनगर कारखान्यांचे उपाध्यक्ष निखिल कुदळे यांचे ते वडील होत.
