मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : भाग्यवंत ल. नायकुडे,
अकलूज दिनांक 11/01/2026 :
जल हेच जीवन आहे. पाण्याशिवाय सजीव जिवंत राहूच शकत नाही. सजीव, वनस्पती पाण्याशिवाय संपून जातील. हे सर्व माहीत असूनही आपण पाण्याची शुद्धता राखू शकत नाही हे आपल्या सर्वांचे दुर्दैव.
शुद्ध पाणी म्हणजे सजीवांची संजीवनी. नुसते पाणी पिऊन दिवस काढले, जगलो असे सांगणारे जसे काही लोक आहेत तसे दूषित पाणी प्याल्यामुळे जीव गमावलेले पण अनेक उदाहरणे आहेत.
पाण्याची शुद्धता राखणे खूप महत्त्वाचे आहे. आज ग्रामीण भाग असो वा नागरी, जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. विहिरी, ओढे-नदीमधील पाणी आपण कोणतीही प्रक्रिया केल्याशिवाय पिऊ शकत नाही.
आजचा संकल्प
आपण प्रत्येकजण पाणी जपू, पाण्याची शुद्धता जपू. प्रदूषित पाणी सजीवांना धोकेदायक आहे याचे भान ठेवू व पृथ्वीतलावरील नैसर्गिक स्रोत जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

