ताज्या घडामोडी
श्रीमती विमल बंडू मासाळ यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन

श्रीमती विमल बंडू मासाळ यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/12/2025 :
बावडा (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील श्रीमती विमल बंडू मासाळ (वय 79 वर्षे) यांचे शुक्रवारी पहाटे 5 वाजून 2 मिनिटांनी राहते घरी अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात 1 मुलगा, सुन, नातवंडे, असा परिवार आहे.
अत्यंत सुस्वभावी आणि मनमिळाऊ वृत्तीच्या कै.श्रीमती विमल बंडू मासाळ यांच्या निधनाने बावडा आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अस्थी सावडण्याचा विधी रविवार दिनांक 28/12/2025 रोजी सकाळी सव्वा सात वाजता बावडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

