“श्री शंकर” स. सा. कारखाना प्रथम ॲडव्हान्स रु. 3025/- अदा करण्यास प्रारंभ

“श्री शंकर” स. सा. कारखाना प्रथम ॲडव्हान्स रु. 3025/- अदा करण्यास प्रारंभ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 20/12/2025 : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर सन 2025 – 26 च्या गळीत हंगामासाठी दि 16.11.2025 ते दि 30.11.2025 अखेर गळीतास आलेल्या ऊसास प्रथम ॲडव्हान्स रक्कम रुपये 3025/- प्र.मे.टना प्रमाणे सभासद, ऊस उत्पादकांना अदा करण्याचे काम कारखाना प्रशासनाने आज दिनांक 20.12.2025 पासून चालू केले आहे.अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

कारखान्याचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विजयसिंह शंकरराव मोहिते -पाटील, सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व श्री शंकर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते -पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार सिझन 2025-26 मधील कारखान्याचा दर हा प्रथम ॲडव्हान्स रक्कम रु. 3025/- प्र. मे.टन असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले की,सभासद व ऊस उत्पादकांनी कारखान्याचे चेअरमन साहेब रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून सिझन 2025-26 मध्ये कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्यात यावा कारखान्याचे व्यवस्थापन नेहमीच सभासद, ऊस उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे व्यवस्थानाने दाखवून दिले आहे. तरी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवण्याचे आवाहन ॲड. कुलकर्णी यांनी केले .

