ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 17/12/2025 :
आपल्याला आपले पालक, शिक्षक नेहमी चांगले वागा असे सांगत असतात. चांगले वागणे, चांगले बोलणे किंवा चांगला विचार करणे यामुळे आपली सकारात्मक ताकद वाढते.
चांगुलपणा हा फार मोठा सदगुण आहे. कोणी कपटाने वागले, निर्दयपणे वागले, किंवा वैरभाव ठेवला तर तिथे चांगुलपणा उपयोगी पडतो. एकट्या चांगुलपणाच्या जोरावर आपण सर्व नकारात्मक गोष्टी हाणून पाडू शकतो.
मुलांनो, काहीजण आपल्या चांगुलपणाला हसतील, नावे ठेवतील पण माणसांची मने जिंकायची असतील व स्वतःला सिद्ध करायचे असेल तर चांगुलपणाच उपयोगी येतो.
आपली खरी ताकद म्हणजे आपला चांगुलपणा असतो.
सौ. स्नेहलता स. जगताप.

