आंबेमाळ ते गुडवळे धनगरवाडा रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन

आंबेमाळ ते गुडवळे धनगरवाडा रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 17/12/2025 :
चंदगड तालुक्यातील खालसा गुडवळे पैकी आबेमाळ ते गुडवळे धनगरवाडा ग्रामीण मार्ग ५७ चे काम पुर्ण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल. याबाबत यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दातेसाहेब, जिल्हा परिषदेचे मानसिंग पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम लवकर सुरू केले नाही तर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी चंदगड तालुक्यातील खालसा गुडवळे पैकी आंबेमाळ ते गुडवळे धनगरवाडा हा ग्रामीण मार्ग 57 यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून या रस्त्याला ३० लाखाचा निधी मंजूर झाला होता. त्यातून हा रस्ता काही अंशी पूर्ण झाला आहे. त्यानंतर पंतप्रधान सडक योजनेतून या रस्त्यासाठी एक कोटी मंजूर आहेत. परंतु ग्रामीण मार्ग 57 मधील काही शेतकऱ्यांनी केवळ 200 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता कामकाज करण्यास अडथळा निर्माण केला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ एस. कार्तिकेन यांनी सुद्धा हा रस्ता प्रत्यक्ष पाहून कामकाज करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा काल दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी अधिकारी ग्रामस्थ रस्ता करण्यासाठी गेले असता काही लोकांनी हे कामकाज बंद पाडले आहे. जो ग्रामपंचायत सरकारी दप्तरी २६ क्रमांक ठरावाने नोंद असलेला व धनगरवाडा स्थापनेपासून या रस्त्यावर वहिवाट आहे. तो रस्ता घनगर वस्तीसाठी आलेल्या निधीचा वापर हा त्याच ठिकाणी व्हावा अशी मापक अपेक्षा असून मंजूर रस्ता खुला करून देण्यास आपल्या वरीष्ठ पातळीवर कार्यवाही व्हावी, मंजूर झालेल्या रस्त्याचा मार्ग काही मंडळी स्वतःच्या सोयीसाठी बदलत आहेत तरी आपण उच्च स्तरावरून प्रत्यक्ष चौकशी करून मार्ग मोकळा करून धनगर वाड्यावरील वस्तीला व शाळकरी मुला मुलींना हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून द्यावा व रस्त्याचे कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी अडथळा आणणाऱ्या लोकांच्या वर कायदेशीर कारवाई करुन रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन सुरू करु असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला पंधरा दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
शिष्टमंडळात यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख, सुनील शेळके, शहरी जिल्हा अध्यक्ष हेमंत बोडके, ज्ञानेश्वर फाले, खा.गुडवळे सरपंच धुळू फोंडे. किरमटेवाडी सरपंच जोतिबा किरमटे. बाबू सोनू फोडे निनू फोडे निनू विठु फोडे, इत्यादी समावेश होता.

