शांतता हवी असेल, तर सध्या स्पष्टीकरण देणे आणि मागणे सोडा.
शांतता हवी असेल, तर सध्या स्पष्टीकरण देणे आणि मागणे सोडा.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 14/12/2025 :
आपण अनेकदा शांतता शोधतो, पण त्या शांततेला आपण स्वतःहून दूर लोटतो.
कारण प्रत्येक वेळी आपल्याला समजावून सांगायचं असतं आणि समजावून घ्यायचंही असतं.
मानसशास्त्र सांगतं की सतत स्पष्टीकरण देण्याची गरज ही आतल्या असुरक्षिततेतून येते. समोरच्याने आपल्याला चुकीचं समजू नये, ही भीती मनावर ताण वाढवते.
त्याचप्रमाणे, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागणं म्हणजे आपण इतरांच्या वागणुकीवर पूर्ण नियंत्रण ठेवू पाहतो.
पण प्रत्येक माणूस आपल्या मर्यादा, अनुभव आणि मनःस्थितीतून वागतो. हे स्वीकारलं की मन थोडं हलकं होतं.
शांतता म्हणजे सगळ्यांनी आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा सोडणं. काही गोष्टी न सांगितल्याने, न विचारल्यानेच मन स्थिर राहतं.
जे समजायचं असतं, ते काळाच्या ओघात आपोआप समजतं. शांत राहणं ही कमजोरी नाही, तर मानसिक परिपक्वतेची खूण आहे.
राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ

