“ओंकार”चा वजन काटा तंतोतंत वजनाच्या विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब

“ओंकार”चा वजन काटा तंतोतंत वजनाच्या विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 29/11/2025 :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील 2025 – 2026 या सिझन मधील वजन काटा तपासणी भरारी पथकातील वैधमापन अधिकारी पुणे यांनी अचानक वजनकाट्याची पाहणी करून ऊसाने भरलेले व रिकाम्या वाहनाचे वजन काट्यावर सर्वांच्या समक्ष तपासणी केली. निरिक्षक वैध मापन आधिकारी पुणे दि . कि शेजवळ, नि. प्र.उदमले यांनी वजन काटा तंतोतंत असल्याचे प्रमाण पञ दिले.
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी सर्व युनिटवर ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करताना ऊसाचे वजन शेतकऱ्यांनी कोणत्याही वजन काट्यावरून करून आणावे असे जाहीर सांगितले होते तो शब्द खरा ठरला आणि विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब झाला.
“शेतकऱ्यांना ऊस दराबाबत व वजन काट्याबाबत दिलेला शब्द खरे करणारे चेअरमन म्हणजे बाबुरावजी बोत्रे पाटील” वजन काटा तपासणीनंतर ऊस उत्पादक शेतकरी महादेव शेळके पाटील यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
