ताज्या घडामोडी
8.2% GDP वाढ भारताच्या नव्या आर्थिक युगाची नांदी!

8.2% GDP वाढ भारताच्या नव्या आर्थिक युगाची नांदी!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 28/11/2025 :
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जगाला दाखवून देत आहे. आपण केवळ वाढत नाही, तर दिशा ठरवत आहोत. 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा GDP वाढदर 8.2% नोंदवला गेला आहे.
हा आकडा तसा फक्त एक सांख्यिकी नसतो, तो देशाच्या धमन्यांमध्ये वाहणाऱ्या आत्मविश्वासाचा, श्रमाचा, उद्योजकतेचा आणि योग्य राजकीय नेतृत्वाचा पुरावा असतो. आजची ही वाढ आकड्यात मोजली जात असली तरी तिच्या मागे असलेली दूरदृष्टी खूप मोठी आहे.
प्रकाश गाडे
