कु. रोहीणी सुभाष काळे हिचे विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये यश

कु. रोहीणी सुभाष काळे हिचे विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/11/2025 :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ लातूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत शंकरनगर- अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज येथील विद्यार्थिनी कु. रोहीणी सुभाष काळे (पदवी प्रथम वर्ष संगणक विभाग) हिने विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.व सोलापूर विभागीय संघामध्ये तिची निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर यशाबद्दल बद्दल महाविद्यालाचे ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले सदरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून क्रिडा शिक्षक प्रा. विकास शिवशरण यांनी काम पाहिले.
