गुणवंत विद्यार्थी व पालक, शिक्षकांचा सत्कार संपन्न

गुणवंत विद्यार्थी व पालक, शिक्षकांचा सत्कार संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/11/2025 : रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली (तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर) येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मध्य विभाग सल्लागार समिती सदस्य, विद्यालयाचे चेअरमन बाबासाहेब क्षीरसागर होते.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभाग चेअरमन संजीव पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष जे.के. जाधव, मध्य विभाग इन्स्पेक्टर जगदाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाखेचे प्रा. के. के. जाधव, पर्यवेक्षक पवार, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अभिजीत पाटील व सज्जन पवार यांचे सह अन्य मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे हितचिंतक, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, मुख्याध्यापक सोनवणे, शिक्षक गोरे, मोहिते उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात साजरा झाला.
