अंकोली गावच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासात हरिभाऊंचा सर्वात मोठा वाटा – जे. के. बापू जाधव

अंकोली गावच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासात हरिभाऊंचा सर्वात मोठा वाटा – जे. के. बापू जाधव
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/11/2025
अंकोली गावच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान देणारे भैरवनाथ विद्यालय सुरू व्हावे व या विद्यालयाची इमारत पूर्ण व्हावी यासाठी अतिशय कष्ट घेणारे कै. हरिभाऊ दादा सुरवसे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यांच्याबद्दलच्या आठवणी सर्वांच्या मध्ये कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून कर्मयोगीनी प्रतिष्ठान ,अंकोली च्या वतीने श्री बा बा वाघमारे व सौ मनीषा बाळासाहेब वाघमारे यांनी संपादित केलेले आधारवड: आठवणीतील हरिभाऊ दादा सुरवसे या पुस्तकाचे प्रकाशन आज अंकोली येथील भैरवनाथ मंदिरात तील सभागृहात झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य व कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे .के. बापू जाधव यावेळी म्हणाले अंकोली गावच्या विकासात हरिभाऊ दादा सुरवसे यांनी खूप मोठे योगदान दिले आहे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात दिलेले योगदान सर्वांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असेल तर रयत शिक्षण संस्थेच्यादक्षिण मध्य विभागाचे निरीक्षक श्री जगदाळे साहेब यांनी हरिभाऊ दादा सुरवसे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयाच्या उभारणीत अतिशय मोलाचे योगदान दिले आहे त्यांचे कार्य आज आमच्या सारख्या रयत सेवक मंडळींना प्रेरणादायी ठरेल तसेच दत्तात्रय घाडगे यांनी हरिभाऊ सुरवसे यांच्या 82 वर्षातील मैत्री मधील अनेक प्रसंग सांगून त्यांच्यासारखा सच्चा मित्र मिळाला याचा अभिमान असल्याबद्दल चे मत व्यक्त केले तसेच स्कूल कमिटीचे सदस्य व माजी सरपंच सज्जन भाऊ पवार यांनी हरिभाऊंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला व साहेबराव आबा व अमरसिंग बाबा यांच्यासोबत त्यांनी अंकोली गावच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नाचे अनेक प्रसंग सांगितले यावेळी युवा नेते संग्राम भाऊ पवार यांनी हरिभाऊ दादा सुरवसे यांनी सर्वसामान्य माणसांना कशी मदत केली शाळेच्या बांधकामा साठी दिलेले योगदान विसरता येणार नाही तर सोलापूर जिल्हा परिषद पेणुर गटातील माजी सदस्य शिवाजीराव सोनवणे सर यांनी हरिभाऊंनी शाळेसाठी केलेल्या योगदानाबद्दलच्या अनेक आठवणी सर्वांच्या समोर प्रेरणादायी असतील तर संयोजक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहळ पंचायत समितीचे माजी सभापती भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब क्ष्रीरसागर यांनी गावाच्या विकासासाठी हरिभाऊनी दिलेले योगदान हे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असे सांगितले यावेळी या कार्यक्रमसाठी बा बा वाघमारे ,विजय सुरवसे, ग्रामपंचायतचे सदस्य समाधान सुरवसे, भैरवनाथ विद्यालयात ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे के जाधव माजी मुख्याध्यापक गोरे पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते शरद खंडागळे यांच्यासह अंकोली गावातील आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
