फुलेवाडा राष्ट्रीय वारसा (National Habitat) म्हणून घोषित करा

फुलेवाडा राष्ट्रीय वारसा (National Habitat) म्हणून घोषित करा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 22/11/2025 :
फुलेवाडा ही केवळ एक वास्तू नाही; तो सत्यशोधक चळवळीचा जिवंत इतिहास, शूद्र–अतिशूद्र, ओबीसी, दलित, आदिवासी, बहुजन आणि स्त्रियांच्या मुक्तीच्या लढ्याचा प्रस्थानबिंदू आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करून पेटवलेली ज्योती ज्ञानाची मशाल बनून देशभर जी ज्ञानक्रांती झाली त्या क्रांतिदूत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी म्हणजे हा वाडा. अख्ख्या देशाचे भूषण.
इथेच ज्योतिराव–सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजाला नव्या सामाजिक न्यायाचे धडे दिले
आज परिस्थिती गंभीर आहे.
ज्या प्रकारे साबरमती आश्रम आणि वाराणसी गांधी आश्रम कंपन्यांनी घशात घातले
त्याच धर्तीवर फुलेवाडाही कंपन्या, सरकार व खाजगी संस्था यांच्या हातमिळवणीने काबीज केला जाऊ शकतो, आता तर अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या बाबतीत अशी शक्यता वाढत चालली आहे.
म्हणूनच आपण सर्व बहुजन, वंचित, दलित, ओबीसी, आदिवासी, विमुक्त, स्त्रीवादी आणि प्रगतिशील संघटना, चळवळी
हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, बोलणी करण्यासाठी आणि आपल्या ज्ञानदात्या राष्ट्रपिता व राष्ट्रमाता
यांच्या प्रेरणादायी ऐतिहासिक वारशाला अधोरेखित करण्यासाठी एकत्र येणे अत्यावश्यक आहे.
आपली मागणी:
पुण्यातील फुलेवाडा तात्काळ राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करावा, आणि कोणत्याही खाजगी किंवा कांपनी व्यवस्थापना कडे तो सोपवला जाऊ नये.
फुले–आंबेडकरी व समतावादी पुरोगामी लोक-आधारित संघटना, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत यांनी या बाबत निर्णायक भूमिका घ्यावी.
जतन व संवर्धन व निर्णय प्रक्रियेत समविचारी संघटनांचा सार्वजनिक सहभाग सुनिश्चित केला जावा.
मूळ इतिहास, संग्रह व लोकस्मृती अक्षरशः डोळ्यात तेल घालून जपाव्या लागतील.
फुलेवाड्याची जपणूक म्हणजे 19,व्या शतकातील बहुजन सामाजिक क्रांतिकारक इतिहास, शिक्षण व ज्ञान प्राप्ती व ज्ञान दान आणि ज्ञान मीमांसा अधिकाराचा इतिहास, स्त्री मुक्ती व मानवी हक्काचा इतिहास अध्यासन केंद्र, सत्यशोधक तत्वज्ञान निर्मिती व अभ्यास केंद्र म्हणून सुद्धा हा वाडा येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी जतन करून ठेवायला हवा
यासाठी कायम झटत असणारे
पुण्यातील प्रमुख सामाजिक नेतृत्वाने पुढाकार घ्यावा, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढा उभा करू शकतो.
सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून विषमता निर्मुलनाचा ध्यास घेणारे फुलेंचे खरे वारसदार डॉ. बाबा आढाव, डॉ.भारत पाटणकर, प्रा. प्रतिमा परदेशी, सचिन माळी व शीतल साठे, नितीन पवार, मानव कांबळे, मारुती भापकर व सर्व
फुले–शाहू, आंबेडकरवादी संघटना, संशोधक, कलाकार, अभ्यासक, तरुण महिला, ट्रान्स समूह, वंचित बहुजन , आदिवासी, विमुक्त, अपंग , मी व अधिकार वादी , पर्यावरण वादी — सर्वांनी एकत्र येणे आज अत्यावश्यक आहे.
राज्य सरकार व खाजगी कंपन्या यांच्या हितसंबंधातून “विकास”च्या नावाखाली हा वारसा गिळंकृत करून टाकण्यापूर्वी आपणच आपला वारसा वाचवला पाहिजे.
फुलेवाडा जपू या —
शोषितांच्या ज्ञान भूमीच्या इतिहासाचा राष्ट्रीय वारसा,
सामाजिक क्रांतीचे केंद्र,
भारतीय स्त्रीवादी–आणि मनुस्मृतीला गाडून पहिला हौद सर्वांसाठी खुला केला गेला ती ही सामाजिक जागृतीच्या विविध आंदोलन , गीते, कार्यक्रम, मोर्चानी गुंजत असलेली आपली सर्वांची वास्तू राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करून संरक्षित व सुरक्षित करण्यासाठी एकत्र आवाज उठवू या.
— डॉ. लता प्रतिभा मधुकर
संस्थापक, सत्यशोधक ओबीसी महिला परिषद
