मनाची शुद्धता

- मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/11/2025 :
जीवनात आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट हवी तेंव्हा मिळेलच असे नसते. अनेकदा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्याव्या लागतात.
ज्यांनी वाईट परिस्थितीत दिवस काढलेत त्यांना या गोष्टींची सवय असते. हे लोक आहे त्यामध्ये समाधान मानतात. मात्र ज्यांना परिस्थितीची झळ बसली नाही असे लोक नाराज होतात, खचून जातात.
जीवनात जे मिळेल त्यात समाधानी राहण्याची आपण प्रत्येकाने सवय केली पाहिजे. कमी मिळाले म्हणून खचू नये किंवा भरपूर मिळाले म्हणून मातू नये हेच कधीही योग्य. परिस्थिती कधीच कायम स्वरूपी नसते, ती बदलत असते.
आजचा संकल्प
जीवनात सतत स्थित्यंतर होत असते. पैसा, पद, प्रसिद्धी येत-जात असते. त्यामुळे जशी परिस्थिती येईल तशी स्वीकारण्याची मानसिकता ठेवू व समाधानी राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
======================

