वारकरी सांप्रदायाच्या वतीने गिरीश शेटे यांचा सन्मान

वारकरी सांप्रदायाच्या वतीने गिरीश शेटे यांचा सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 28/10/2025 :
कार्तिक वारीसाठी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी अकलूज येथे शेटे व्यापारी संकुल मधील गिरीश शेटे संपर्क कार्यालयात माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांची सदिच्छा भेट घेतली.
माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल गिरीश शेटे यांचा वारकरी सांप्रदायाच्या वतीने त्यांनी सन्मान केला. यावेळी ह.भ.प. गणेश महाराज काळे पंढरपूर, ह.भ.प. सुद्रिक महाराज मांडवगण कैकाडी महाराज मठ, वारकरी रामभाऊ जाधव अक्कलकोट, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी डॉ. उदयसिंह तात्यासाहेब पवार यांनी संपर्क कार्यालयात येऊन नूतन तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांचा सन्मान केला तेव्हा त्यांच्या समवेत माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी नूतन सरचिटणीस संतोष पांडुरंग कांबळे उपस्थित होते.

