गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
(संजय लोहकरे याज कडून)
संग्रामनगर दिनांक 21/7/2023 : माळीनगर येथील गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांची आज शाळेत मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कुल व अनुपम नेत्र रुग्णालय अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.निखिल गांधी, एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार पृथ्वीराज भोंगळे, आशुतोष देशपांडे, वसंत आंबोडकर, शिवाजी सुरनर, नाजमीन शेख, सोबिया इनामदार, आशा जैन आदी उपस्थित होते.
अनुपम नेत्र रुग्णालयाचे डॉ. निखिल महावीर गांधी हे गुलमोहर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी केली.
डॉ.निखिल गांधी म्हणाले,मायोपिया क्लिनिक नावाची एक स्वतंत्र क्लिनिक आहे.त्यामध्ये फक्त लहान मुलांच्या तपासणीसाठी ज्यांना डोळ्यांचा नंबर असणार आहे त्यांच्यासाठी डेडिकेटेड एक युनिट सुरू केलेले आहे. जे भारतामध्ये प्रथम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे. यामध्ये फक्त डोळ्यांचा नंबर काढला जात नसून इतर काही आठ तपासण्या ही केल्या जात आहेत. त्या क्लिनिकमध्ये नुसता नंबर नाही दिला जात तर ज्यांना चष्म्याचा नंबर आहे तो कमी करण्याचे तसेच प्रोग्रेसिव्ह स्लोडाऊन करू शकतो. त्याच्या बद्दलची माहिती व ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे ज्या मुलांचा चष्म्याचा नंबर वाढत चालला आहे. त्यांच्यासाठी आता ग्लासेस आलेले आहेत तसेच वेगळे ड्रॉप्स पण आलेले आहेत. ते वापरल्यानंतर आपण ते कमी करू शकतो किंवा स्लो डाऊन करू शकतो. या डोळे तपासणीत ज्या मुलांना चष्म्याचे नंबर आहेत त्यांना या मायोपिया क्लिनिकमध्ये रेफर करणार असल्याचेही डॉ.गांधी यांनी सांगितले.