सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दुर्गाफेस्ट २०२५ निमित्त “सायबर क्राईम अवेअरनेस अँड सेल्फ डिफेन्स” या विषयावर व्याख्यान संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दुर्गाफेस्ट २०२५ निमित्त “सायबर क्राईम अवेअरनेस अँड सेल्फ डिफेन्स” या विषयावर व्याख्यान संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/09/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज येथे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाफेस्ट २०२५ निमित्त महिला तक्रार निवारण समिती मार्फत महाविद्यालयातील विद्यार्थिनीं व महिला कर्मचारी यांना वाढत्या सायबर क्राईम बद्दल सजग करण्याच्या हेतूने “सायबर क्राईम अवेअरनेस अँड सेल्फ डिफेन्स” या विषयावर व्याख्यान संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर व्याख्यानाकरिता प्रमुख व्याख्यात्या म्हणून करिश्मा महादेव वणवे (पोलिस उपनिरीक्षक अकलूज पोलीस स्टेशन, निर्भया पथक प्रमुख अकलूज विभाग) या उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत प्रसाद सूर्यवंशी (पोलीस कॉन्स्टेबल अकलूज पोलीस स्टेशन) व विशाल घाडगे (पोलीस कॉन्स्टेबल अकलूज पोलीस स्टेशन) हे उपस्थित होते विशाल घाडगे यांनी निर्भया पथकाबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर प्रमुख व्याख्यात्या करिश्मा महादेव वणवे यांनी वाढत्या सायबर क्राईमच्या घटना, त्याचे प्रकार, त्यापासून कसे बचाव करता येते तसेच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या खबरदारीविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. तसेच ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील गैरवापर, तसेच महिलांसाठी कायदेशीर मदत याविषयी सविस्तर माहिती देऊन आत्मसंरक्षणाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील महिला कर्मचारी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रगती पाटील यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता रिसवडकर व प्रा. संजीवनी भोसले यांनी केले.