⭕ एकदा होऊन जाऊ द्या महाराष्ट्राचा नेपाळ
⭕ एकदा होऊन जाऊ द्या महाराष्ट्राचा नेपाळ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/09/2025 :
या महिन्यातील अगदी महत्त्वाची घटना म्हणजे नेपाळमध्ये झालेला उद्रेक व त्याचे परीणाम व त्याला पुढे करून भारतातील अपयशी राजकीय नेते व लिब्राडू पत्रकार यांनी सुरू केलेला भ्रम.
हे सर्व पाहण्याच्या आधी आपण नेपाळमध्ये का उद्रेक झाला याची काही ढोबळ करणे पाहू
अस्थीर सरकार व अय्याशी पुरोगामी
एक) म्हणजे नेपाळचे राष्ट्रीय उत्पन्नाचा 33% भाग हा जे नागरिक प्रदेशात जाऊन नोकरी धंदा करतात त्यांनी पाठवलेल्या पैशातून उभा राहतो. दुसरे कारण म्हणजे गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ नेपाळमध्ये कधीही स्थिर सरकार राहिलेले नाही. बारा वर्षात बारा पंतप्रधान या देशाने पाहिले.
सत्तेवर जातानाच त्या स्वतःला माहीत असते की आपण अल्पजीवी आहोत. त्यामुळे जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत ओरबडायचे हे त्यांचे धोरण असते. त्यामुळेही नेपाळमध्ये लाच लुचपतीची परिस्थिती.
तिसरे कारण म्हणजे नेपाळमधील उमराव धनिक व भ्रष्टाचारी राजकारणी व त्यांची कर्तृत्व नसलेली मुले यांनी भ्रष्टाचाराच्या द्वारे जी ऐय्याशी चालवली होती त्याचा राग जो सर्वसामान्य जनतेच्या मनात होता त्याचा उद्रेक झालेला आहे.
सुखासीन लष्कर भ्रष्टाचारी पोलीसदल
नेपाळची लोकसंख्या फक्त तीन कोटी आहे. त्यापैकी 2/3 लोकसंख्या आहे लहान मुले स्त्रिया व वृद्ध नागरिक आहेत.
दोन लाखा चा जमाव गोळा केला की तेथे काहीही होऊ शकते.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नेपाळच्या पोलिसालातील भ्रष्टाचार आपणास आठवत असेल. आपल्या देशातील अनेक वॉन्टेड लोक यांना नेपाळमध्ये आसरा मिळतो व ते नेपाळमधून आपल्या देशातील गुन्हे घडवत असतात.
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे नेपाळच्या सैन्याला आज पर्यंत कधीही कोणत्याही युद्धाला तोंड द्यावे लागलेले नाही. त्यामुळे ते निष्क्रिय व सुखासीन झालेले आहेत.
अनेक कारणे नेपाळच्या उठावाला कारणीभूत झाली.
पुढील पन्नास वर्षे नेपाळ पुन्हा उभारणार नाही असे नुकसान झालेले आहे. 1000 इमारती भस्मसात करण्यात आल्या आहेत. या दंगली एकूण नुकसान 25 हजार अब्ज कोटी रुपयांचे झालेले आहे.
भ्रमीष्टाचे स्वप्नरंजन
हे सर्व भारतात घडवता येईल व आपण आपल्या ताब्यातून गेलेली अकरा वर्षांपूर्वीची सत्ता पुन्हा मिळवता येईल असा भ्रम काही लोकांना झालेला आहे व त्यांनी एक मोठा भ्रामक प्रचार सुरू केलेला आहे. भारतात पण नेपाळ सारखे होईल काही भाबडे राष्ट्रवादी पण या विचाराने घाबरून गेले आहेत.
भारतात अशक्य
भारतामध्ये हा प्रकार कधीही होणे शक्य नाही. येथील पोलीस, सैन्य व राजकीय कार्यकर्ते हे अतिशय जागरुकअसतात. भारताचा नेपाळ का होणार नाही यावर मी दोन दिवसात एक वेगळा एक लेख लिहीत आहे.
भ्रष्टाचारी पुरोगामी
परंतु आजचा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार यांनी नेपाळ होईल अशी शाप वाणी मुख्यमंत्री फडवणीस यांना दिली आहे.
हे पाहिल्यावर पवार साहेबांना आंतरराष्ट्रीय राजकारण याची माहिती नसावी असे मला वाटत आहे.
नेपाळमध्ये कोणास जाळले?
पवार साहेब आपण जो शाप दिला आहे त्यामध्ये आपणास माहित आहे नेपाळमध्ये वामपंथी नेते व त्यांची घराणी व त्यांच्या संपत्ती याला टार्गेट करण्यात आलेले होते. वामपंथी म्हणजे आपल्या देशातील पुरोगामी होय.
या वामपंथी नव श्रीमंतांची मिळकती जाळून राखरांगोळी करण्यात आल्या. भ्रष्टाचारी नेते व त्यांचे कुटुंब यांच्यावर हल्ले झाले. त्यांच्या मिळकती नष्ट करण्यात आल्या.
मग आपणच पहा आपल्या देशात भ्रष्टाचाराने अब्जाधीश झालेले पुरोगामी विचाराचे नेते कोण आहेत? कोण घराणेशाहीसाठी सतत आपला जीव पाखडत असते? कुणाच्या पुढच्या पिढ्या ह्या बापजाद्यानी केलेल्या भ्रष्टाचाराच्या वर ऐय्याशी करत आहेत ?
त्यामुळे भारतामध्ये नेपाळ झाला तर अधिक कुणाला सोसावे लागेल याचा विचार झालेला बरा.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 0 49
इचलकरंजी