‼️ कर्टुल्याची भाजी ‼️

‼️ कर्टुल्याची भाजी ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक :आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/7/2025 : पावसाळा आला की, बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या मिळतात. यांची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच यांच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. बाजारात भाजी आणायला गेल्यावर अनेकदा कर्टुले बघितले असतील. बरेच लोक ही भाजी घेत नाहीत. पण एकदा जर कर्टुल्याची भाजी खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ही भाजी खाल. कर्टुल्याला कटुले, कर्टुले म्हणतात; तर कुठे करटोली म्हणतात तर काही भागांमध्ये यांना रानकारले असंही म्हणतात.
पोषक तत्वे
या भाजी मध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन डी2 आणि 3, व्हिटॅमिन-एच, व्हिटॅमिन-के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्वे आढळतात.
या भाजीचे फायदे
जर हृदयारोग, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, मधुमेह किंवा अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर कर्टुल्याची भाजी खूप फायदेशीर ठरते. जर हाय ब्लड प्रेशर असेल तर ही भाजी खाऊन फायदा मिळू शकतो. तसेच वात, पित्त सुद्धा ही भाजी कंट्रोल मध्ये ठेवते. या भाजीचं सेवन करून इम्यूनिटी वाढते, त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते.
भाजी बनवण्याची पध्दत*
कारल्या प्रमाणे कर्टुल्याचे स्लाईस करा. कांदा, टॉमेटोच्या फोडणीवर कर्टुले परतून वाफवा. यामध्ये आवडीनुसार हळद, तिखट, मसाला, धने जिर्याची पूड, मीठ, शेंगदाण्याचा कूट मिसळून भाजी बनवा. जास्तीत जास्त लोक कर्टुल्याची साल काढून फेकतात. पण असं करू नये कारण यात जास्त पोषक तत्व असतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण