सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये टेकमहर्षि या राज्यस्तरीय टेक्नीकल इव्हेंटचे आयोजन
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये टेकमहर्षि या राज्यस्तरीय टेक्नीकल इव्हेंटचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/11/2025 :
येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये महाविदयालय विकास समिती अध्यक्षा कु स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली इयत्ता 10 वी व 12 वी च्या विदयार्थ्यांसाठी रविवार दि. 30/11/2025 रोजी टेकमहर्षि या राज्यस्तरीय टेक्नीकल इव्हेंटचे आयोजन केल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली. या राज्यस्तरीय टेक्नीकल इव्हेंटमध्ये अकलूज व पंचक्रोशीतील विविध शाळामधील इयत्ता 10 वी व 12 वी च्या विदयार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व प्रकल्प स्पर्धा इत्यादी स्पर्धाचा सामावेश करण्यात आलेला आहे.
ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने जयसिंह मोहिते-पाटील यांनी शै.वर्ष 2011 मध्ये सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयाची स्थापना केली. या अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये विदयार्थ्यांचा सर्वागीन विकास व्हावा या हेतुने नेहमीच विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विदयार्थी, पालक व कंपनीमधील अभियांत्रिकेची मागणी याचा विचार करून शै.वर्ष 2024-25 पासून पदवी विभागामध्ये आर्टिफिशीअल इंटेलिजन्स अॅण्ड डेटा सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग तसेच शै.वर्ष 2025-26 पासून पदविका विभागामध्ये आर्टिफिशीअल इंटेलिजन्स अॅण्ड मशिन लर्निंग व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या नवीन विदयाशाखा सुरू करून ग्रामीण भागातील विदयार्थ्यांची आधुनिक शिक्षणाची सोय कलेली आहे तरी अकलूज व पंचक्रोशीतील शाळामधील सर्व दहावी व बारावीमधील विदयार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी केले.
