❇️ मनाची शुद्धता

❇️ मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 13/8/2025 :
सध्या श्रावण महिना चालू आहे. घरोघरी उपवास व व्रतवैकल्ये केली जातात. पवित्र ग्रंथांचे वाचन, पारायणे केली जातात. त्यांच्या समाप्तीचा सोहळा केला जातो. जेवनाच्या पंक्ती उठवल्या जातात. सर्वत्र देव-धर्म चालू असतो.
हे सर्व करताना धर्मकांड म्हणून न करता आतून, मनातून भाव ठेवून करणे जास्त महत्वाचे. आपण जे वाचन करतो त्यातून मनातील सात्विक भाव जागृत झाले तर त्याचा वर्तनात सकारात्मक परिणाम होतो.
आपल्या घरातील धार्मिक वातावरण म्हणजे अंधश्रद्धा नको. दररोजची स्तोत्रे, मंत्रपठण, आरती यामधून आपल्याला भावनिक व मानसिक दृष्ट्या सकारात्मक परिणाम दिसून येतात. हे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
आजचा संकल्प
आपण प्रत्येकजण आपल्या घरातील धार्मिक वातावरण अनुभवत असताना त्याचा आपल्या जडण घडणीवर कसा सकारात्मक परिणाम होईल याची काळजी घेऊ व संस्कारित होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.
- संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
################₹#################