शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार २०२६ चे आयोजन

शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार २०२६ चे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/11/2025 :
मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रीसर्च शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महाविद्यालय स्तरावरील आविष्कार २०२६ या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाज उपयोगी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. ही संशोधन स्पर्धा महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा मा. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य वसंतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली व विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकांचे जीवन सुलभ व सुखर होईल असे प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन त्यांनी केले.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास ७० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला त्यामध्ये एकुण स्पर्धकांपैकी बारा स्पर्धकांचे विद्यापीठाच्या विभागीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती अविष्कार चे महाविद्यालयाचे संयोजक प्रा. अनिल कोकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी ह्युमॅनिटी अँड फाईन आर्ट्स, कॉमर्स मॅनेजमेंट लॉ, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी, प्युअर सायन्स, ग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी आदी विभागामध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. या स्पर्धेमध्ये डॉ.एस व्ही पिंगळे आणि डॉ. आर. व्ही सुर्वे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदर स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील व संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

