साखर उद्योगात शाश्वशता निर्माण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचा सन्मान

साखर उद्योगात शाश्वशता निर्माण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचा सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/7/2025 :
साखर उद्योगात शाश्वतता निर्माण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचा सन्मान करण्यात आला.
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील संचालक प्रशांतराव बोत्रे पाटील यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून बंद असणारे साखर कारखाने चालु करून ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांच्यात शाश्वतता निर्माण करून ग्रामीण भागाचा कायापालट केला. याची दखल घेऊन नवी दिल्ली येथे विकसीत भारत 202५ लिङरशीफ या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय उद्योग मंत्री चिराग पासवान हे ही उपस्थित होते. देशात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कामगारांचे जीवनमान उंचावण्याचे काम ओंकार परिवाराकङुन करण्यात आले. साखर कारखानदारी बरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व कारखान्यावर वृक्षारोपण त्या झाडांचे संगोपन केले. विविध सामाजिक कामे हाती घेऊन दुर्लक्षित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप केले. याची दखल विकसित भारत लिङशीफ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गङकरी यांच्या हस्ते ओंकार परिवाराचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांना समारंभपूर्वक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या बद्दल ओमराजे यांचे आभिनंदन अशोक बँकेचे चेअरमन व संचालक जनल मॅनेजर कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक शेतकरी बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.