उज्जैनकर फाउंडेशनच्या आळंदी येथील संमेलनात कवी संमेलन व बोलीभाषा सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उज्जैनकर फाउंडेशनच्या आळंदी येथील संमेलनात कवी संमेलन व बोलीभाषा सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/01/2025 : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगाव आणि मराठी साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या संमेलनात कवी संमेलन संपन्न झाले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज साहित्य नगरी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज व्यासपीठ मोरया मंगल कार्यालय, आळंदी देवाची येथे मान्यवरांच्या व फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील साहित्यिक, रसिक, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात दिघी आळंदी येथील महिला मंडळांनी भजनांचचे सादरीकरण केले. यासाठी संमेलनाच्या निमंत्रक तथा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा सौ. रुपाली चिंचोलीकर यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसंगी फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा सदस्य जादूगार डी. चंद्रकांत यांनी पपेट शो सादर केला. त्याचप्रमाणे फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार, राज्य सचिव एडवोकेट सर्जेराव साळवे डॉ. निवृत्ती जाधव, राज्य खजिनदार रामदास कोरडे, राज्य प्रसिद्ध प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत व स्थानिक विद्यार्थ्यांनी व कलाकारांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडे, अभंग, भक्ती गीत सादर केली.
रात्री 8 ते 11 या वेळात राज्य सल्लागार सतीश सोलांकुरकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. याप्रसंगी संमेलनाचे सहसंयोजक अजीत भाऊ वडगावकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी सौ.रूपालीताई चिंचोलीकर ,रामचंद्र गुरव, गणेश आघाव, तुळशीराम बोबडे, डॉ. अशोक शिरसाट, डॉ. पंढरीनाथ शेळके, डॉ.मा.ग. गुरव, रामदास कोरडे ,अँड सर्जेराव साळवे , शाहीर मनोहर पवार, कविता पाचंग्रे, किशोर पाटील, डॉ. लता थोरात ज्योती पुजारी, शिल्पा देशमुख, नंदा लाड, प्रवीण सूर्यवंशी आधी कवी व कवयित्रींनी उत्साह पूर्ण सहभाग घेऊन उपस्थितांची दाद मिळवली.