सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात रत्नत्रय परिवाराची गरुड झेप

🟣 सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात रत्नत्रय परिवाराची गरुड झेप
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/7/2025 : माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर सारख्या ग्रामीण भागात रत्नत्रय परिवाराने रत्नत्रय पतसंस्था,रत्नत्रय इंग्लिश मेडियम स्कूल,श्रद्धा कॉम्प्युटर, विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय अशा विविध संस्था स्थापन करून त्यांच्या मार्फत अनेक सामाजिक कामे करून समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले असून याचे सर्व श्रेय या परिवाराचे संस्थापक अनंतलाल (दादा ) दोशी यांना जाते
अनंतलाल दादा यांचा जन्म रतनचंद व सुशीलादेवी यांच्या पोटी 15/07/1950 रोजी मांडवे तालुका माळशिरस या छोट्या गावी झाला 3 बहिणी 2 भाऊ आई वडील असा मोठा परिवार लहान वयातच त्यांच्यावर या सर्वांची जबाबदारी आल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून त्यांनी आपल्या परिवारासाठी वयाच्या 22 व्या वर्षी सदाशिवनगर या ठिकाणी 26 जानेवारी 1972 रोजी एक छोटसं सायकलचे पंचर दुकान चालू करून आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली… अशा गरीब परिस्थितीत देखील त्यांच्यातील व्यवसाय करण्याची जिद्द फुलचंद दोशी माढा यांनी ओळखली व त्यांची कन्या मृणालिनी यांचा विवाह अनंतलाल दादा यांच्याशी 6 जानेवारी 1975 रोजी करून दिला… खऱ्या अर्थाने मृणालिनी भाभींची लक्ष्मीची पावले दादांच्या घरी आली व तेव्हापासूनच दादांच्या गरीब परिस्थितीला सुख-समृद्धीची झालर चालू झाली दादांच्या खांद्याला खांदा लावून मृणालिनी भाभीनी संसाराचा गाडा ओढण्यास सुरुवात केली व त्यांच्याबरोबर त्यांच्या व्यवसायाला व मोठ्या कुटुंबाला खंबीर साथ दिली व आजतागायत त्या त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत
हळूहळू दादांनी आपल्या व्यवसायामध्ये त्यांचे लहान बंधू अभय कुमार व अजित कुमार यांच्या मदतीने किराणा दुकान चालू करून वीस वर्षात त्या व्यवसायामध्ये जम बसवला….व व्यवसाय पहात असताना सुद्धा सामाजिक धार्मिक कामे करण्याची मोठी इच्छा होती आपल्या जवळ जे आहे त्याचा उपयोग इतरांना व्हावा या दृष्टीने त्यांनी सदाशिवनगर येथे आपले चिरंजीव वीरकुमार भैय्या प्रमोद भैय्या व गावातील 20 /25 तरुण मुले यांना घेऊन 1992 साली नेहरू युवा मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर पालखी सोहळ्याचा अन्नदान वृक्षारोपण स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्वच्छता मोहीम गावागावातून लेक वाचवा संदेश देण्यासाठी सायकल रॅली नेहरू युवा बचत फंड अशी अनेक सामाजिक कामे सुरू केली… 1996 साली सकल जैन समाजाला एकत्र करून पहिली भगवान महावीर जयंती साजरी केली व गेली 29 वर्षे ती आजही चालू आहे…..
त्यानंतर संगणकाचे युग सुरू झाले या संगणकाच्या प्रणालीचा लाभ परिसरातील गोरगरीब ग्रामीण विद्यार्थ्यांना व्हावा ही तळमळ त्यांची असल्याने 4/2/1999 साली त्यांनी श्रद्धा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ची स्थापना केली या इन्स्टिट्यूट चे काम प्रमोद दोशी पाहत असून या इन्स्टिट्यूटमुळे सदाशिवनगर सारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना संगणकाचे शिक्षण मिळू लागले.या संस्थेचा फायदा हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना होत असून यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळू लागली आहे..
या एका संस्थेवरच ते थांबले नाहीत त्यांनी सन 2000 साली विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय सुरू केले या वाचनालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे पुस्तके वाचण्यास मिळू लागली या सर्व कामात चांगले यश मिळू लागले त्यामुळे ही सामाजिक कामे झाली परंतु लोकांची आर्थिक मान उंचावण्या करता या परिसरातील गरजू व्यवसायिकांना आर्थिक हातभार कसा लावता येईल व या साठी काय करावे असा विचार अनंतलाल दादांच्या मनात सुरू झाला त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे जाऊन त्यांनी पतसंस्थेची मागणी केली…त्यावेळेस 2004 साली विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी तातडीने रत्नत्रय पतसंस्थेला परवानगी दिली…व ८ मार्च 2004 साली रत्नत्रय पतसंस्थेची स्थापना झाली.अनंतलाल दोशी हे मूरबी व्यापारी असल्याने व परिसरातील लोकांच्या विश्वास असल्यामुळे 21 वर्षात संस्थेकडे 23 कोटीच्या ठेवी जमा झाल्या….या ठेवीच्या माध्यमातून परिसरातील गोरगरीब व गरजू व्यवसायिकांना कर्ज पुरवठा केल्याने आज अनेक व्यवसायिकांना आर्थिक पाठबळ मिळत आहे संस्थापक अनंतलाल दोशी व सर्व संचालक यांच्यावर ठेवेदार सभासद यांचा विश्वास असल्याने गेली 21 वर्षे संस्था नेत्र दिपक प्रगती पदावर आहे..पतसंस्थेच्या भरीव कामगिरी नंतर रत्नत्रय परिवाराने अनंतलाल दोशी यांच्या मार्गदर्शना खाली 8 विद्यार्थ्यांसह 21 जुलै 2008 साली रत्नत्रय इंग्लिश स्कूलची स्थापना केली यामुळे परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मापक फि मध्ये इंग्रजी शिक्षण . मिळू लागले…त्यानंतर त्यांनी हळूहळू पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण चालू केली व त्यानंतर त्यांनी माळशिरस नातेपुते दहिगाव अशा ठिकाणी आपल्या शाळेच्या शाखा काढून त्या व्यवस्थित प्रकारे कार्यरत आहेत. आज संस्थेकडे एकूण पट 1000 झाला आहे तो आनंतलाल दादा व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे…..
या सर्व संस्थावर अनंतलाल दादांचे विशेष लक्ष असते काटकसर करून संस्था कशा चालवून नावारूपाला आणता येतील हा कटाक्ष त्यांचा असतो त्यामुळे त्यांनी काढलेल्या सर्व संस्था व्यवस्थित चालत असून भविष्यात इतरांसाठी अजून काय करता येईल याचा विचार ते सारखा बोलवून दाखवतात…या सर्व कामांची दखल वेळोवेळी सामाजिक संस्था घेत असतात त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना प्रधान झालेली आहेत केलेल्या कामाची पोहच त्यांना पुरस्कार देऊन करण्यात येते आणि अशी पाटीवर कोणी शाबासकीचे थाप मारली की सामाजिक कार्य करण्यासाठी आणखीन नवीन ऊर्जा मिळते असे अनंतलाल दोशी सांगतात…त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नत्रय परिवार उंच भरारी घेईल यात शंका नाही.
ज्ञानेश राऊत
सचिव,रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर