रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रत्नचंद दोशी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रत्नचंद दोशी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/07/2025 : गत पन्नास वर्षापासून समाजसेवा व शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पितपणे अविरत कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांचा 75 वा वाढदिवस (भव्य नागरी अमृत महोत्सव) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.
अमृत महोत्सव निमित्त मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 8:40 ते 9:30 वाजता सदाशिवनगर येथील राहते घरापासून स्वागत मिरवणूक, 9:30 वा. रक्तदान शिबिराचे उद्घाटन, 10:15. स्वागत, औक्षण, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, 10:45. वा. उपस्थित मान्यवरांची शुभेच्छापर मनोगते, 11:30 वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार, 12:00 वा. पासून स्नेहभोजन, दुपारी 1:30 वा. महिला कुस्ती स्पर्धा या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मांडवे (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) या ठिकाणी संपन्न होणाऱ्या भव्य नागरी अमृत महोत्सव प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनंती आवाहन रत्नत्रय परिवार व दोशी परिवार सदाशिवनगर यांनी केले आहे.