ताज्या घडामोडी

जरांगे पाटील बोलले चौंडीत, लाख टक्केकीं बात!

जरांगे पाटील बोलले चौंडीत,
लाख टक्केकीं बात!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 27/10/2023 :
24 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात मेळाव्याना उधाण आलं होत. भल्या पहाटे नागपूरमध्ये rss चा दसरा मेळावा झाला. तिथंच दिवसभर बौद्ध बांधवांचा धम्म चक्र परिवर्तन दिनाचा सोहळा झाला. लगेच दुपारी चौंडीत धनगर आरक्षण दसरा मेळावा आणि त्याचं वेळी भगवान गडावर पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा. तर सायंकाळी आझाद मैदान येथे शिव सेना शिंदे गट यांचा दसरा मेळावा तर शिव तीर्थावर शिव सेना ठाकरे गट यांचा दसरा मेळावा.
जवळ पास सर्वच जातीचे दसरा मेळावे झाले. प्रत्येक मेळाव्याला दसरा मेळावा नावं असले तरी प्रत्येक मेळाव्याचे उद्देश वेगवेगळे होते. आपण इथे धनगर आरक्षण दसरा मेळाव्यावर बोलू या.
चौंडीला झालेल्या धनगर आरक्षण मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनी दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. तें म्हणाले, आमचं आरक्षण जरा अवघड आहे. तरी पण तें मी मिळविनारच. तुमच आरक्षण लई सोपं आहे. तुम्हाला तर घटनेतचं आरक्षण आहे. फक्त धनगरचा धनगड झाला तेवढा ड आणि र चा फरक दुरुस्त करायचा आहे बस. त्यासाठी तुम्ही 70 वर्ष लढत आहात. पण यश मिळत नाही. कारण तुमची लढाई योग्य दिशेला नाही. आरक्षणासाठी लढायचं तर डोक्यात फक्त आरक्षणचं हवं. राजकारण त्यात घालायचं नाही. आपलं आयुष्य गेलं तसं आपल्या लेकरांच आयुष्य वाया जाऊ नये म्हणून एकत्र यां आणि प्रामाणिक पणे फक्त आरक्षणाचा लढा उभा करा. घरा घरात जाऊन धनगर जागा करा. सत्ता खुर्ची डोक्यात न ठेवता लढा तुम्ही नक्की विजयी व्हाल. म्हणजे कांय तर “मुखमे आरक्षण बगलमे कुर्शी ” हे चालणार नाही आणि आपल्या पुढाऱ्यांनी यांच्या शिवाय दुसरा खेळ केला नाही. समाज गंगाखेड येथे लाखोने जमला, सांगली, पंढरपूर, नागपूर येथे लाखोने जमला. अजूनही अनेक ठिकाणी लाखोनी धनगर गोळा झाले पण परिणाम शून्य झाला. कारण गर्दी विकून नेत्यांनी खुर्च्या घेतल्या हे सत्य नाकारता येणार नाही.
तें जरांगे पाटलांच्या बाबतीत नाही. त्यांना सत्तेची हाव नाही, समाजाला न्याय मिळवून देण्याची ओढ फक्त डोक्यात आहे. म्हणून सर्वं समाज त्यांचा शब्द पाळतो. त्यांनी नेत्यांना गाव बंदीचा आदेश दिला. सर्वं समाजाने तों पाळला. समाजातील दिग्ज जेष्ठ श्रेष्ठ नेते शरद पवार यांची सुद्धा वाट आडविण्याचं धाडस मराठा कार्यकर्त्यांनी केलं. तसं आपणही केलं पाहिजे. पण आपण मंत्री पाहिला कीं, लागतों शेपट्या हलवायला.
आपल्यात एकी नाही हे आपण रोज दाखवून देतो. आरेवाडी आणि चौँडी असे दोन मेळावे घ्यायची गरज होती का? बरं घेतलें तर घेतले, मग उपोषण कर्ते बंडागर-रूपनवर यांचा आरेवाडीत सत्कार घ्यायला कांय अडचण होती? तसेच गोपीचंद पडळकर सारख्या लढावय्या फायर ब्रँड नेत्याला चौँडीत बोलवायला कांय अडचण होती? कशा मुळे ही दुही, फटाफुट? अहंकार, श्रेयवाद, हेवेदावे आणि वैयक्तिक स्वार्थ हे यां फुटीच्या मुळाशी आहेत.
दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट जरांगे पाटील यांनी सांगितली, कीं राज्यात मराठा आणि धनगर याच जाती सर्वात मोठ्या आहेत. सर्वात जास्त टॅक्स भरणारे आपणच आहोत. आपल्या पैशातून सर्वांना वाटप होत. होऊ द्या पण या वाटपात आमच्याही लेकरांना द्या! सरकार देत नसेल तर आपण दोघे मराठा आणि धनगर एकत्र येऊन लढाई करू.
मला हां मुद्दा खूप आवडला. जे धनगर नेते जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत. म्हणजे बाळासाहेब दोलतोडे वगैरे त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घ्या. बोलणं करा आणि धनगर-मराठा संघटित होऊन संयुक्त लढा उभा करा. दोघांची संयुक्त पत्रक काढा. त्यात मराठा आरक्षणा सोबतचं धनगर आरक्षणाचाही उल्लेख करा. आणि लढाई सुरु करा. मराठा समाजाने मंत्र्यांना गाव बंदीचा ठरावं केला आहे त्यात धनगरानी सामील व्हा. आंदोलनाची व्याप्ती आणि उंची वाढेल. त्यातून सर्वं पक्षांना धडकी भरेल.
भगव्या झेंड्या सोबत पिवळे झेंडे घ्या. जय शिवराय बरोबर जय मल्हारच्या गर्जना करा. एक मराठा लाख मराठा बरोबर एक धनगर लाख सिकंदर ची घोषणा द्या. जरांगे पाटील आज पुन्हा आमरण उपोषणाला बसत आहेत त्यांना मंडपात जाऊन पाठिंबा द्या. आपण सोबत आहोत सांगा त्यांना.
चौंडीत जरांगे पाटील यांनी धनगर मराठा संयुक्त आंदोलनाची जी घोषणा केली, त्याच प्रकारची घोषणा गोपीचंद पडळकर यांनी आरेवाडीत केली. पडळकर भाषणात म्हणाले, आरक्षणाच्या बाबतीत मराठा आणि धनगर दोघांची फसवणूक सरकार करत आहे. त्यावर विजय मिळविण्या साठी धनगर मराठा आरक्षण मार्गी लागण्यासाठी आम्ही आज हिंदुस्थान शिवमल्हार संघटनेची स्थापना करत आहोत. अजून काय हव.
मग व्हा पुढे करा बोलणी आणि उभारा लढा. एकत्र येण्याने दोन्ही समाजाचा फायदा होणार असेल तर बरोबरीच्या नात्याने या एकत्र. दोघांचाही फायदा होईल. मराठा समाज कोरड्या लाकडा सारखा आहे. पटकन पेट घेतो. पण धनगर ओल्या लाकडा सारखा आहे, लवकर पेटत नाही आणि पेटला तर नुसता धुराळा. दोघांनाही फायदा होईल. नाही जुळलं तर स्वतंत्र. गाजराची पुंगी वाजली तर वाजवा नाही वाजली तर मोडून खा. पण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. हाय काय नी नाय काय!

 

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button