“रुस्तम-ए-हिंद” भारतीय कुस्तीगीर सतपाल सिंह यांचे अकलूज नगरीत स्वागत

“रुस्तम-ए-हिंद” भारतीय कुस्तीगीर सतपाल सिंह यांचे अकलूज नगरीत
स्वागत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13 जानेवारी 2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘शिवतीर्थ’ आखाडा येथे सालाबादप्रमाणे त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्ल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, “रुस्तम-ए-हिंद” भारतीय कुस्तीगीर सतपाल सिंह यांचे अकलूज नगरीत झाले आहे. त्यांचे स्वागत स्पर्धा प्रमुख सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी स्पर्धेचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, दिपकराव खराडे पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, शि. प्र.मंडळाचे संचालक नारायण फुले, विनोदकुमार दोशी, मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील, स्पर्धा नियोजन समितीचे वसंत जाधव, सचिव बिभीषण जाधव, मंडळाचे संचालक,सदस्य उपस्थित होते