ताज्या घडामोडी

भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानचा कणा मोडणारा हल्ला: नूरखान एयरबेसवर विनाशकारी स्ट्राइक

भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानचा कणा मोडणारा हल्ला: नूरखान एयरबेसवर विनाशकारी स्ट्राइक

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/07/2025 :
भारताने नूर खान एअरबेसवर केलेल्या विनाशकारी हल्ल्याचे नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत!! हे रोमांचक असून संपूर्ण जागतिक संरक्षण चित्र बदलवणारे आहे!! जी माहिती समोर आली आहे ते ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल..
जेव्हा एखादा देश आपली संपूर्ण ताकद, रणनीती आणि तंत्रज्ञान वापरून शत्रूच्या सर्वात सुरक्षित, गोपनीय आणि अजेय समजल्या जाणाऱ्या ठिकाणाचा विनाश करतो तेव्हा तो फक्त हल्ला नसतो, तो इतिहास घडवतो.
पाकिस्तानच्या नूर खान एयरबेसवर भारतीय वायुसेनेने केलेली स्ट्राईक हा असाच एक ऐतिहासिक क्षण होता, ज्यात शब्दांपेक्षा मौन प्रभावी होत आणि स्फोटापेक्षा तीव्र होता अचूकतेचा घाव..
संपूर्ण लेख वाचल्यानंतर… तुम्हीही नकळत “जय हिंद” म्हणाल…!!
नूर खान एयरबेस हे पाकिस्तानच्या सायबर कमांड,सैटेलाइट कम्युनिकेशन आणि अणु रणनीतीचं केंद्र होतं. जमिनीपासून सुमारे ५०-६० फूट खाली अमेरिकन तंत्रज्ञानाच्या सुरक्षात्मक थरांनी युक्त स्टील-काँक्रीट बंकर होतं.
त्यांना वाटलं होतं की हे अभेद्य आहे, पण भारताने दाखवून दिलं की अभेद्यता ही एक फसवणूक असते, जेव्हा समोर भारताची इच्छाशक्ती आणि NavIC ची अचूकता असते.
हल्ल्याची जी नवी कहाणी सार्वजनिक डोमेनमध्ये लीक होत आहे ती एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखी वाटते.
६०० किलोमिटर दूरून फक्त दोन बाय दोन फूटांच्या वेंटिलेशन शाफ्टला लक्ष्य करणं, तेही सुपरसोनिक क्षेपणास्त्राने ही सामान्य गोष्ट नव्हती, हे जगासाठी भविष्याचं युद्ध होतं, जे भारताने वर्तमानात लढलं.
आणि भारताने हे सिद्ध केलं की तो फक्त भविष्याकडे पाहत नाही, तर त्यावर राज्यही करतो. हल्ला म्हणजे फक्त एक छिद्र नव्हतं, तर पाकिस्तानच्या सायबर कण्यावर झालेला अचूक काइनेटिक आणि सायबर हल्ला होता,
ज्यात त्यांचे encrypted नेटवर्क उद्ध्वस्त झाले, बॅकअप डाटा रिसेट झाला आणि त्यांच्या अणु क्षमतेवर असा फटका बसला की आता ते फक्त धमक्या देऊ शकतात, हत्यारे नाही.
जसे जसे नूर खान हल्ल्याचे तपशील उघड होत आहेत, भारताची अचूकता आणि प्रहार बघून अमेरिका सहित जगभरचे संरक्षणतज्ज्ञ चकित होत आहेत.
ज्या ठिकाणी त्यांनी अमेरिकेच्या SATCOM प्रणालीशी जोडणी केली होती, जिथून त्यांच्या F-16 आणि AWACS कमांड चालायची, तिथे सध्या शांतता पसरलेली आहे. एक छोटंसं छिद्र पण त्यातून भारताच्या हल्ल्याने पूर्ण कमांड सिस्टीम राख झाली.
Copernicus Sentinel-2 आणि US Global Hawk च्या थर्मल मैपिंगनेही स्पष्ट दाखवून दिलं की तापमानातील असामान्य वाढ एका मोठ्या विनाशाची खूण होती.
एकीकडे हल्ल्याचे तपशील समोर येत आहेत, दुसरीकडे पाकिस्तान शांत आहे, आणि ही शांतता त्यांच्या पराभवाची सर्वोच्च साक्ष आहे.
भारताने केवळ त्यांची स्ट्राईक-बॅक क्षमता नष्ट केली नाही, तर CPEC सारख्या चीनच्या प्रकल्पांवरही अप्रत्यक्ष प्रभाव टाकला. आता चीनलाही आपल्या तथाकथित ‘स्टील फ्रेंड’च्या सुरक्षेवर शंका आहे.
हा फक्त पाकिस्तानसाठी नाही, तर जगभरातील त्या देशांसाठी इशारा होता जे समजतात की भारत फक्त शब्द वापरतो. नाही, भारत आता हातात तलवार घेऊन उभा आहे, आणि ती तलवार आता थेट शत्रूच्या नसांवर घाव करते कोणतीही पूर्वसूचना न देता.
NavIC सारखी स्वदेशी तंत्रज्ञानं, OSINT आणि HUMINT च्या माध्यमातून वर्षानुवर्षांची तयारी, आणि क्षेपणास्त्रांची अशी अचूकता की अमेरिकेचं Tomahawk आणि इस्रायलचं Delilahही लाजून जाईल हे सगळं एकत्र येऊन भारताने अशा शत्रूला घाव दिला जो जगाला अणु बॉम्बच्या धमक्या देत होता.
पाव पाव किलोच्या अणु बॉम्बने घाबरवत होता.
पाकिस्तानसाठी हा हल्ला एक स्ट्राईक नव्हता, ही एक चेतावणी होती की भारत आता ‘आधी हल्ला करणार नाही’ या पानाला घडी करून बाजूला ठेवला आहे.
जगाला वाटत होतं की भारत फक्त शांततेची भाषा बोलतो, पण भारताने दाखवून दिलं की तो जेव्हा मारतो तेव्हा शत्रूला हे कळतही नाही की तो कधी संपून गेला.
ना कुठला गोंगाट, ना कुठली घोषणा भारताने जगाला दाखवून दिलं की तो सर्जिकल स्ट्राईक आणि आधुनिक युद्धकलेत मास्टर आहे.
आता प्रश्न पाकिस्तानचा नाही, प्रश्न उरलेल्या जगाचा आहे ते समजतील का की भारत आता फक्त एक बचावात्मक राष्ट्र नाही, तर आधुनिक युद्धकलेचा गुरु झालाय?
चला, आपल्या शूर सैनिकांना आणि गुप्तचर संस्थांना नमन करूया, ज्यांनी हा इतिहास घडवला. भारत आता अजेय आहे आणि आधुनिक युद्धाची व्याख्या बदलत आहे.
जय हिंद.. 🇮🇳
विष्णुगुप्त

ही माहिती प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी!
जर तुम्हालाही भारताच्या शक्तीचा अभिमान वाटतो
तर ही पोस्ट गर्वाने शेअर करा .फॉलो करा | शेअर करा | गर्वाने “जय हिंद” म्हणा!

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button